पुणे (28 मार्च 2024) – रेलीगेशन फेरीत दुसऱ्या दिवशी शेवटचा सामना नाशिक विरुद्ध सातारा यांच्यात झाला. नाशिक संघाचा पहिला सामना बरोबरीत राहिला होता तर सातारा संघाने आपला पहिला सामना गमावला होता. सामन्याची सुरुवात अत्यंत संथ झाली होती. दोन्ही संघ कोणत्याही धोका न पत्करता खेळ खेळत होते. 8 मिनिटांच्या खेळानंतर सामना 4-4 असा बरोबरीत होता.
नाशिक संघाकडून शिवकुमार बोरगुडे व ऋषिकेश गडाख ने चढाईत गुण मिळवत संघाला आघाडी मिळवून दिली. दोन्ही संघ गुण मिळवण्यासाठी संघर्ष करत होते. मध्यंतराला पाच मिनिट शिल्लक असताना नाशिक संघाने सातारा ऑल आऊट करत 12-05 अशी आघाडी मिळवली होती. त्यानंतर सातारा संघाच्या गणेश अवले ने चढाईत झटपट गुण मिळवत संघाची पिछाडी कमी केली. मध्यंतराला नाशिक संघाकडे 13-12 अशी नाममात्र 1 गुणांची आघाडी होती. त्यानंतर नाशिकच्या शिवकुमार बोरगुडे ने चपळाई ने खेळ करत गुण मिळवले.
शिवकुमार बोरगुडे ने सुपर टेन पूर्ण करत नाशिक संघाला आघाडी मिळवून दिली. शेवटची पाच मिनिटं शिल्लक असताना नाशिक संघाकडे 29-20 अशी आघाडी होती. नाशिक संघाने 33-24 असा विजय मिळवला. नाशिक कडून शिवकुमार बोरगुडे ने सर्वाधिक 12 गुण मिळवले. ज्ञानेश्वर शेळके ने पकडीत 4 गुण मिळवले. तर सातारा कडून गणेश अवले ने चढाईत तर पकडीत 2 गुण मिळवले.
बेस्ट रेडर- शिवकुमार बोरगुडे, नाशिक
बेस्ट डिफेंडर- ज्ञानेश्वर शेळके, नाशिक
कबड्डी का कमाल- शिवकुमार बोरगुडे, नाशिक
महत्वाच्या बातम्या –
रेलीगेशन फेरीत धुळे संघाचा सलग दुसरा मोठा विजय
रेलीगेशन फेरीत जालना संघाचा सलग दुसरा विजय, तर लातूर संघाचा दुसरा पराभव