महाराष्ट्रातील महिला कुस्तीपटूंसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेची घोषणा केली असून, सांगली या ऐतिहासिक स्पर्धेचे यजमानपद भूषवेल. 23 व 24 मार्च रोजी ही स्पर्धा पार पडेल. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी याबाबतची घोषणा केली.
बाळासाहेब लांडगे यांनी याबाबतची घोषणा करताना म्हटले,
“महाराष्ट्रात महिला कुस्तीला चालना देण्यासाठी आम्ही पहिल्या महिला महाराष्ट्र केसरीची घोषणा करत आहे. विजेत्या स्पर्धकाला चांदीची गदा बक्षीस म्हणून देण्यात येईल. महाराष्ट्रातील 34 जिल्हे व 11 महानगरपालिका असे एकूण 45 संघ या स्पर्धेत सहभागी होतील. सांगली तालीम संघ या स्पर्धेचे यजमानपद भूषवेल.”
या स्पर्धेत मुख्य फेरीसह विविध वजनी गटातील सुवर्णपदकासाठीच्या लढती देखील खेळल्या जातील. यामध्ये 50, 53, 55, 59, 62, 65, 68, 72 व 76 या वजनी गटांचा समावेश आहे. यासोबतच 27 व 28 मार्च रोजी राज्यस्तरीय ग्रीको रोमन अजिंक्यपद स्पर्धा देखील खेळली जाईल. परिषदेच्या या निर्णयाचे कुस्तीप्रेमी तसेच महिला कुस्तीपटूंनी स्वागत केले आहे.
(First Womens Maharashtra Kesari Held In Sangali From 23 To 24 March)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ट्विटरवर अडचणीत सापडला अश्विन! थेट एलॉन मस्कला टॅग करत मागितला सल्ला, नक्की काय घडलंय वाचाच
Video- मोबाईलमध्ये रमलेल्या धवनने वडिलांना दिले नाही पाणी; संतापलेली बहीण म्हणाली, ‘पप्पा, हा खूप…’