---Advertisement---

टी२० मध्ये अखेरच्या पाच षटकात सर्वाधिक ‘फोडकाम’ करणारे धुरंधर

On: सोमवार, मे 17, 2021 9:31 PM
Virat Kohli and MS Dhoni
---Advertisement---

टी२० क्रिकेटमध्ये नेहमीच फलंदाजांचे वर्चस्व दिसून येते. आंतरराष्ट्रीय टी२० सामने असो किंवा कोणत्याही देशातील टी२० लीगमध्ये फलंदाज नेहमीच चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत असतात. आज आपण टी२० क्रिकेटमध्ये शेवटच्या पाच षटकांत सर्वाधिक धावा जमवणिऱ्या फलंदाजांविषयी जाणून घेऊया.

१. एमएस धोनी
टी२० क्रिकेटच्या इतिहासात अखेरच्या पाच षटकांत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या नावावर आहे. डेथ ओव्हर्समध्ये महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय व लीग टी२० मध्ये मिळून १०१४ धावा केल्या आहेत. या बाबतीत तो सर्व फलंदाजांच्या पुढे आहे. शेवटच्या षटकात त्याने केलेल्या या धावा संघाच्या विजयात बर्‍याच वेळा उपयुक्त ठरल्या आहेत. धोनीला क्रिकेटविश्वातील सर्वात्तम फिनीशर म्हटले जाते.

२. शोएब मलिक
भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाचा पती शोएब मलिक याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला आहे . मात्र, तरीही अनेक देशांमध्ये खेळल्या जाणार्‍या टी२० लीगमध्ये तो भाग घेतो. धोनीनंतर टी२० क्रिकेटमध्ये शेवटच्या पाच षटकांत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम शोएब मलिकच्या नावावर आहे. त्याच्या नावावर ८६२ धावा आहेत.

३. डेव्हिड मिलर
दक्षिण आफ्रिकेचा डेव्हिड मिलर टी२० क्रिकेटमध्ये एक धोकादायक फलंदाज मानला जातो. मिलरनेही शेवटच्या पाच षटकांत दमदार फलंदाजी केली आहे. धोनी आणि मलिकनंतर डेथ ओव्हर्समध्ये सर्वाधिक धावा बनविण्याच्या विक्रम मिलरच्या नावे आहे. मिलरच्या नावे आतापर्यंत ७८८ धावा आहेत.

४. विराट कोहली
टी२० क्रिकेटमध्ये अखेरच्या पाच षटकांत सर्वाधिक धावा ठोकणार्या फलंदाजांमध्ये विद्यमान भारतीय कर्णधार विराट कोहली देखील आहे. क्रिकेटविश्वातील सर्वात्तम फलंदाज असलेल्या विराट कोहलीने टी२० मध्ये अखेरच्या पाच षटकांत ७२८ धावा केल्या असून तो चौथ्या क्रमांकावर आहे.

५. मोहम्मद नबी
अफगाणिस्तानचा दिग्गज अष्टपैलू मोहम्मद नबी या यादीमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. नबीच्या नावे आतापर्यंत आंतरराष्ट्रीय व टी२० लीग क्रिकेटमध्ये ७१३ धावा आहेत. नबी अफगाणिस्तानच्या संघाचा आधारस्तंभ आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

अर्जन नागवासवालाचा मोठा खुलासा, प्रारंभीच्या काळात ‘या’ भारतीय गोलंदाजाची करायचा कॉपी

Video: नवदीप सैनीने केली नव्या थारची अनोखी टेस्टिंग; खराब, कच्च्या रस्त्यांवरच नाही, तर नाल्यातही चालवली महागडी गाडी

किवी संघावर हिटमॅनची दहशत! पाहा रोहितने न्यूझीलंडविरुद्ध उभारलेल्या तीन सर्वोत्तम खेळी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---