fbpx
Sunday, April 11, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

करियरच्या अखेरच्या चेंडूवर विकेट घेणारे ५ गोलंदाज, ऍडम गिलख्रिस्टनेही केला आहे हा कारनामा

November 14, 2020
in टॉप बातम्या, क्रिकेट
0

कोणत्याही प्रकारच्या क्रिकेट सामन्यात गोलंदाजांचे मुख्य कर्तव्य फलंदाजाची विकेट घेणे असते. क्रिकेट कारकीर्दीत, सर्व गोलंदाज आपण घेतलेल्या विकेट्सपैकी काही खास विकेट्स अभिमानाने सांगतात, ज्या ते त्यांच्या आयुष्यात विसरू शकत नाहीत.

प्रत्येक गोलंदाजासाठी त्याची अविस्मरणीय विकेट ही त्याची पहिली विकेट असते, त्याचप्रमाणे त्याची शेवटची विकेट देखील खास असते. जेव्हा एखादा गोलंदाज त्याच्या कारकीर्दीच्या शेवटच्या चेंडूवर विकेट घेतो तेव्हा त्याचा आनंद अवर्णनीय असतो. त्यांच्या कारकीर्दीच्या शेवटच्या चेंडूवर विकेट घेणाऱ्या पाच गोलंदाजांवर आपण एक नजर टाकूया.

१) सर रिचर्ड हॅडली ( Sir Richard Hadlee)

न्यूझीलंडचे महान अष्टपैलू खेळाडू रिचर्ड हॅडली हे त्यावेळचे दिग्गज वेगवान गोलंदाज होत. त्यांच्या प्रभावी स्विंग गोलंदाजीसमोर मोठमोठे फलंदाज हतबल होताना दिसत.

४०० कसोटी बळी मिळविणारे ते पहिले गोलंदाज होते. त्यांनी, आपल्या कसोटी कारकिर्दीत ४३१ विकेट्स घेतले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये १०० बळी आणि १००० धावा करणारे हॅडली पहिले अष्टपैलू खेळाडू होते.

जुलै १९९० मध्ये त्यांनी आपल्या अखेरच्या बर्मिंघम कसोटी सामन्यात यजमान इंग्लंडविरुद्ध, इंग्लंडच्या दुस-या डावात डेव्हन मॅल्कम (०) यांना पायचीत करून त्यांनी इंग्लंडचा डाव संपुष्टात आणला. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सर हॅडली यांचा तो अखेरचा चेंडू होता.

२) लसिथ मलिंगा (Lasith Malinga)

श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला सुरुवात केल्यानंतर आपल्या विचित्र ‘बॉलिंग ॲक्शन’ मुळे लक्ष वेधून घेतले. आपल्या घातक यॉर्करने त्याने प्रतिस्पर्धी फलंदाजांवर धाक निर्माण केला.

मलिंगाला चाहते ‘हॅटट्रिकचा राजा’ म्हणतात. कारण त्याने, सर्वाधिक आंतरराष्ट्रीय हॅटट्रिक घेतल्या आहेत. त्याने आतापर्यंत ५ आंतरराष्ट्रीय हॅटट्रिक घेतल्या आहेत. यात, एकदिवसीय सामन्यात तीन आणि टी२० मध्ये दोन हॅटट्रिकचा समावेश आहे. मलिंगाने सलग चार चेंडूंवर चार बळी घेण्याची किमया दोन वेळा केली आहे.

मलिंगा अजूनही टी२० क्रिकेटमध्ये सक्रिय असला तरी त्याने यापूर्वी कसोटी आणि एकदिवसीय निवृत्ती घेतली आहे. तो आपला शेवटचा एकदिवसीय सामना बांगलादेशविरुद्ध २६ जुलै २०१९ रोजी कोलंबो येथे खेळला. त्याने विरोधी फलंदाज मुस्तफिजुर रहमानची विकेट घेऊन खेळ संपविला होता.

३) ग्लेन मॅकग्रा (Glenn McGrath)

जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट इतिहासातील सर्वात महान वेगवान गोलंदाजांबद्दल बोलले जाते तेव्हा ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा याचे नाव नेहमी घेतले जाते. मॅकग्राची आंतरराष्ट्रीय कारकीर्द १९९३ ते २००७ दरम्यान राहिली. जवळपास १५ वर्षाच्या कारकिर्दीत मॅकग्राने ९४९ बळी मिळवले. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट घेणाऱ्या वेगवान गोलंदाजांच्या यादीत मॅकग्रा अजूनही अव्वल स्थानी आहे.

मॅकग्राने जानेवारी २००७ मध्ये इंग्लंड विरुद्ध सिडनी येथे शेवटची कसोटी खेळली. तिथे त्याने दुसऱ्या डावाच्या शेवटच्या चेंडूवर जेम्स अँडरसनला झेलबाद करत इंग्लंडचा डाव संपवला.

४) मुथय्या मुरलीधरन (Muttiah Muralitharan)

श्रीलंकेचा माजी ऑफस्पिनर मुथय्या मुरलीधरन फिरकीचा जादूगर म्हणून ओळखला जातो. १९९२ ते २०११ दरम्यानच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत मुरलीधरनने तब्बल १,३४७ आंतरराष्ट्रीय बळी घेतले. यामध्ये कसोटीत ८००, वनडे क्रिकेटमध्ये ५३४ तर १३ टी२० बळींचा समावेश होतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तसेच कसोटी आणि एकदिवसीय स्वरूपातही तो सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे.

मुरलीधरनने आपली शेवटची कसोटी जुलै २०१० मध्ये ग़़ॉल येथे भारताविरुद्ध खेळली होती. भारताच्या प्रग्यान ओझाच्या विकेटने भारताचा त्या सामन्यातील दुसरा डाव संपवला आणि तोच त्याचा अखेरचा आंतरराष्ट्रीय चेंडू ठरला. त्या विकेटमुळे मुरलीधरन ८०० कसोटी बळी मिळविणारा पहिला गोलंदाज बनला.

५) ऍडम गिलख्रिस्ट ( Adam Gilchrist)

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दिग्गज यष्टिरक्षक-फलंदाज ऍडम गिलख्रिस्टने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत केवळ एक विकेट घेतला आणि तोदेखील कारकिर्दीच्या शेवटच्या चेंडूवर.

किंग्ज इलेव्हन पंजाब आणि मुंबई इंडियन्स यांच्यात धर्मशाला येथे १ मे २०१३ रोजी खेळल्या गेलेल्या आयपीएलमधील सामन्यात त्याने हा कारनामा केला. शेवटच्या षटकात मुंबईला विजयासाठी ५१ धावा हव्या होत्या. हे लक्ष अशक्यप्राय होते. तेव्हा कारकिर्दीत प्रथमच गोलंदाजीसाठी आलेल्या गिलख्रिस्टने त्या षटकातील पहिल्याच चेंडूवर हरभजन सिंगला बाद केले. धवल कुलकर्णी जखमी असल्याने तो डाव हरभजनच्या विकेटने संपला.

उभ्या क्रिकेट कारकिर्दीत गिलख्रिस्टने कधीही कसोटी, वनडे किंवा आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात एकदाही गोलंदाजी केली नाही. अगदी प्रथम श्रेणी सामन्यांतही त्याने गोलंदाजी केली नाही. अ दर्जाच्या सामन्यात त्याने केवळ १२ चेंडू व आयपीएलमध्ये १ असे केवळ १३ चेंडू त्याने गोलंदाजी केली.


Previous Post

राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी गरीब मुलांबरोबर लुटला फुटबॉल खेळण्याचा आनंद ;पाहा व्हिडिओ

Next Post

भारतीय प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालेले ३ ऑस्ट्रेलियन क्रिकेटर

Related Posts

Photo Courtesy: Twitter/@DelhiCapitals
IPL

बलाढ्य चेन्नईवर मात करण्यात ‘या’ खेळाडूंनी उचलला खारीचा वाटा; पाहा दिल्लीच्या विजयाचे नायक

April 11, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

‘भारतात अफाट प्रतिभा, ते एक युग क्रिकेटविश्वावर राज्य करु शकतात,’ दिल्लीकरांच्या फलंदाजीवर इंग्लिश दिग्गज फिदा

April 11, 2021
Photo Courtesy: Twitter/ICC
क्रिकेट

जबरदस्त! अवघ्या १४ धावा करुनही आझमची ट्वेंटी ट्वेंटीतील मोठ्या विक्रमाला गवसणी, ठरला पहिलाच

April 11, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

पराभवाचं दुख अन् त्यात शिक्षा! ‘या’ कारणामुळे एमएस धोनीला तब्बल १२ लाखांचा झाला दंड

April 11, 2021
Photo Courtesy: Twitter/@ChennaiIPL
IPL

DC च्या हातून CSK चारीमुंड्या चित, कॅप्टन धोनीने ‘यांच्या’वर फोडले पराभवाचे खापर

April 11, 2021
Photo Courtesy: Twitter/ChennaiIPL
IPL

‘या’ संघाविरुद्ध चेन्नई नेहमीच गंडते; पाहा चेन्नईला सर्वाधिकवेळा पराभूत करणारे संघ

April 11, 2021
Next Post

भारतीय प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालेले ३ ऑस्ट्रेलियन क्रिकेटर

"धोनी आयपीएल २०२१ ला चेन्नईचे कर्णधारपद सोडेल", या दिग्गजाचे मोठे वक्तव्य

...म्हणून युवराज सिंगला 'त्या'दिवशी करायची नव्हती अंघोळ

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.