भारतात सध्या कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. तरीही कोरोनाच्या सावटाखाली सध्या भारतात इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगाम सुरु आहे. या हंगामाचा पहिला टप्पा सुरळीच पार पडला होता. मात्र, दुसऱ्या टप्प्याच्या सुरुवातीलाच मोठे धक्के बसत आहेत.
नुकतेच असे वृत्त पुढे येत आहे की, दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिशनच्या (डीडीसीए) ग्राउंड स्टाफमधील पाच कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यानंतर त्यांना विलिगीकरणात ठेवण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे.
डीडीसीएच्या अरुण जेटली स्टेडियमवर सध्या आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यातील सामने चालू आहेत. ग्राउंड स्टाफमधील कर्मचारी पॉझिटिव्ह आढळ्यानंतर मंगळवारी (०४ मे) सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात होणाऱ्या आयपीएल २०२१ च्या ३१ व्या सामन्यावर परिणाम होऊ शकतो.
या मैदानावर अजून काही सामने व्हायचे बाकी आहेत. ८ मे रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात दिल्लीच्या मैदानावर शेवटचा आयपीएल सामना होणार आहे. त्यानंतर पुढील सामने बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियम आणि कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर होणार आहेत.
महत्त्वाचे म्हणजे हे वृत्त येण्यापूर्वीच कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघातील सोमवार (०३ मे)चा सामना पुढे ढकलण्यात आला आहे. कोलकाता संघातील वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर हे दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. याबरोबरच चेन्नई सुपर किंग्ज संघातील ३ सदस्यही कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. चेन्नईचे सीईओ कासी विश्वनाथन, गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी आणि बस क्लिनर यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल बिग ब्रेकिंग! कोलकाता पाठोपाठ आता चेन्नईचे ३ सदस्य देखील कोरोना पॉझिटिव्ह





