शनिवारी (7 ऑक्टोबर) दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यातील रोमांचक सामना चाहत्यांना पाहायला मिळाला. विश्वचषक 2023 मधील हा चौथा सामना असून दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दोन्ही संघ आमने सामने होते. क्विंटन डी कॉक, रासी वॅन डर ड्युसेन आणि ऍडेन मार्करम यांच्या शतकी खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेने या सामन्यात मोठी धावसंख्या केल्या. मार्करमच्या नावावर विश्वचषकातील सर्वात वेगवान शतक नोंदवले गेले.
दक्षिण आफ्रिकेचा मध्यमक्रमातील फलंदाज ऍडेन मार्करम (Aiden Markram) याने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात अवघ्या 49 चेंडूत शतक ठोकले. विश्वचषकाच्या इतिहासातील हे सर्वात वेगवान शतक देखील ठरले. याआधी हा विक्रम आयर्लंडच्या केविन ओब्रायन याच्या नावावर होता. ओब्रायनने 2011 विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध खेळताना 50 चेंडूत शतक केले होते. मात्र, शनिवारी मार्करमच्या वादळी खेळीनंतर हा विक्रम मोडीत निघाला. यादीत तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल, चौथ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज एबी डिविलियर्स, तर पाचव्या क्रमांकावर इंग्लंडचा विश्वचषक विजेता कर्णधार ओयन मॉर्गन आहे. (Five Fastest Century in WC history)
Aiden Markram broke a 12-year old record to become the fastest-ever century maker in @cricketworldcup history ????#CWC23 | #SAvSL pic.twitter.com/Hq85CrNvMc
— ICC (@ICC) October 7, 2023
विश्वचषकातील सर्वात वेगवान (चेंडूंमध्ये) शतके
49 – ऍडेन मार्करम विरुद्ध श्रीलंका (2023*)
50 – केविन ओब्रायन विरुद्ध इंग्लंड (2011)
51 – ग्लेन मॅक्सवेल विरुद्ध श्रीलंका (2015)
52 – एबी डिविलियर्स विरुद्ध वेस्ट इंडीज (2015)
57 – ओयन मॉर्गन विरुद्ध अफगाणिस्तान (2019)
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
दक्षिण आफ्रिका – क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डेर ड्युसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुन्गी एन्गिडी.
श्रीलंका – पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दासुन शानाका (कर्णधार), दुनिथ वेललागे, कसुन राजिथा, दिलशान मदशाना, दिलशाना मदुशंका, माथेशा पाथीराना.
महत्वाच्या बातम्या –
World Cup Breaking: मार्करमने ठोकली वर्ल्डकप इतिहासातील सर्वात वेगवान सेंच्युरी, फक्त ‘इतक्या’ चेंडूत गाठली शंभरी
डी कॉक-ड्युसेनने रचिला पाया, मार्करम-मिलर झाले कळस! श्रीलंकेसमोर 429 धावांचे आव्हान