---Advertisement---

World Cup Breaking: मार्करमने ठोकली वर्ल्डकप इतिहासातील सर्वात वेगवान सेंच्युरी, फक्त ‘इतक्या’ चेंडूत गाठली शंभरी

---Advertisement---

2023 वनडे विश्वचषकाच्या चौथ्या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने श्रीलंकेविरुद्ध धावांचा डोंगर रचला. आधी क्विंटन डी कॉक व रासी वॅन डर डसेन यांनी शतके झळकावल्यानंतर अनुभवी ऐडन मार्करम याने देखील श्रीलंकन गोलंदाजांचा समाचार घेतला. त्याने केवळ 49 चेंडूंमध्ये शतक पूर्ण करत विश्वचषक इतिहासातील सर्वात वेगवान शतक झळकावले. त्याने आयर्लंडचा केविन ओब्रायन याचा 2011 मध्ये इंग्लंडविरुद्ध केलेला 50 चेंडूतील शतकाचा विक्रम मोडीत काढला.

या सामन्यात प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बवुमा लवकर बाद झाला. त्यानंतर क्विंटन डी कॉक व रासी वॅन डर डसेन यांनी डावाची सूत्र हाती घेत तब्बल 204 धावांची भागीदारी केली. यादरम्यान दोघांनी आपापली शतके पूर्ण केली. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या ऐडन मार्करम याने सुरुवातीपासूनच जोरदार आक्रमण केले. त्याने चार चौकार मारत चांगली सुरुवात केलेली.

त्याने श्रीलंकन गोलंदाजांवर कोणतीही दयामाया न दाखवता केवळ 49 चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले. हे वर्ल्डकप इतिहासातील सर्वात वेगवान शतक ठरले. यानंतर तो फार काळ टिकू शकला नाही. त्याने 54 चेंडूंमध्ये 106 धावांची खेळी केली. यामध्ये 14 चौकार व तीन षटकारांचा समावेश होता.

(South Africas Aiden Markram Hits Fastest ODI World Cup Century In Just 49 Balls Against Srilanka)

हेही वाचा-
‘एक पराभव आमचं काहीही…’, न्यूझीलंडविरुद्ध दारुण पराभव होताच इंग्लंडच्या विश्वविजेत्या कर्णधाराचे बडेबोल
“मला लाज वाटतेय…”, बीसीसीआयच्या वर्ल्डकप आयोजनावर गावसकरांची संतप्त प्रतिक्रिया

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---