क्रिकेटच्या मैदानावर अनेक वेळा अशी दृश्यं पाहायला मिळतात, जी पाहून आपल्याला हसू आवरता येत नाही. असाच काहीसा प्रकार बांगलादेश विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान पाहायला मिळाला.
सोमवारी (1 एप्रिल) सामन्याच्या तिसऱ्या दिवशी श्रीलंकेच्या फलंदाजानं मारलेला चौकार रोखण्यासाठी एक-दोन नव्हे तर पाच बांगलादेशी क्षेत्ररक्षक धावले! याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून क्रिकेट चाहत्यांना खूप हसू येत आहे. कोणी म्हणतंय, “हे काय चाललंय”, तर कोणी ‘लगान’ चित्रपटाची आठवण करून देतोय.
झालं असं की, हसन महमूदनं 21व्या षटकाचा दुसरा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला, ज्यावर प्रभात जयसूर्यानं गली मध्ये शॉट खेळला. यानंतर स्लिपमध्ये उपस्थित पाचही क्षेत्ररक्षक चेंडू पकडण्यासाठी धावले. पाच खेळाडू एकत्र धावताना पाहून समालोचकांनाही आश्चर्य वाटलं. चेंडू सीमारेषेजवळ थांबला तोपर्यंत जयसूर्यानं दोन धावा पूर्ण केल्या होत्या. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यावर युजर्स विविध कमेंट करत आहेत.
R̶e̶a̶l̶ ̶l̶i̶f̶e̶ ̶i̶n̶c̶i̶d̶e̶n̶t̶ ̶i̶n̶s̶p̶i̶r̶i̶n̶g̶ ̶a̶ ̶m̶o̶v̶i̶e̶
Movie inspiring a real-life incident 🎥
.
.#BANvSL #FanCode pic.twitter.com/1USI5EH9cV— FanCode (@FanCode) April 1, 2024
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा श्रीलंकेची दुसऱ्या डावात 25 षटकांत 6 बाद 102 अशी धावसंख्या होती. जयसूर्या नाबाद 3 तर अनुभवी अष्टपैलू अँजेलो मॅथ्यूज 39 धावांवर नाबाद आहे.
श्रीलंकेची एकूण आघाडी 455 धावांची झाली आहे. श्रीलंकेनं पहिल्या डावात 531 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ 68.4 षटकांत 178 धावांत गारद झाला. पहिल्या डावाच्या आधारे श्रीलंकेला 353 धावांची आघाडी मिळाली. यजमान बांगलादेशकडून सलामीवीर झाकीर हसननं पहिल्या डावात सर्वाधिक धावा केल्या. त्यानं 104 चेंडूंत 8 चौकारांसह 54 धावा ठोकल्या. तैजुल इस्लामनं 22 आणि महमदुल हसन जॉयनं 21 धावांचं योगदान दिलं. कर्णधार नझमुल हुसेन शांतोला केवळ एक धाव करता आली. शाकिब अल हसननं 15 धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलच्या चीअरलीडर्सचा पगार किती असतो? एका सामन्यासाठी किती मानधन मिळतं? जाणून घ्या
जोस बटलरनं आपलं नाव बदललं, इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून अधिकृत घोषणा