भारतीय संघाच्या सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक म्हणजे महेंद्रसिंग धोनी. कर्णधार म्हणून असो किंवा फलंदाज म्हणून तो सर्व बाबतीत उत्कृष्ट राहिला आहे. पण भारतीय संघातील काही खेळाडूंसोबत महेंद्रसिंग धोनीचे संबंध वादग्रस्त राहिले आहेत. याच्या बातम्याही अनेक प्रसंगी आपण ऐकल्या आहेत. आज या लेखात आपण अशा पाच खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांचे महेंद्रसिंग धोनीसोबत वादग्रस्त संबंध राहिले आहेत.
वीरेंद्र सेहवाग
भारतीय संघाचा स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यातील संबंध ताणल्या गेल्याच्या बातम्या 2007 मध्येच येऊ लागल्या होत्या. किंबहुना 2007 च्या टी-20 विश्वचषकात कर्णधार महेंद्रसिंग धोनीने अंतिम सामन्यात वीरेंद्र सेहवागच्या जागी युसूफ पठाणला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट केले होते. त्यानंतर वीरेंद्र सेहवागला महेंद्रसिंग धोनीने प्लेइंग इलेव्हनमधून वगळल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, नंतर कळले की वीरेंद्र सेहवाग दुखापतीमुळे अंतिम सामना खेळला नव्हता.
त्यानंतर, 2009 च्या टी-20 विश्वचषकादरम्यान, पुन्हा एकदा महेंद्रसिंग धोनी आणि वीरेंद्र सेहवाग यांच्यात दुरावा आल्याच्या बातम्या आल्या होत्या. ज्यामध्ये वीरेंद्र सेहवाग 2009 मध्ये खांद्याच्या दुखापतीशी झुंज देत होता आणि दुखापत असूनही टी-20 विश्वचषकात त्याला समाविष्ट करावे लागले होते. त्यानंतर विश्वचषक संपल्यानंतर वीरेंद्र सेहवाग म्हणाला होता की, ‘जर मी कर्णधार म्हणून प्रभावी काम करू शकतो तर, मग मी उपकर्णधार का व्हावे?’
गौतम गंभीर
गौतम गंभीर आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यामध्ये साधारणपणे कळून येते की, दोन्ही खेळाडूंमध्ये सामान्य संबंध नाहीत. जरी महेंद्रसिंग धोनी यावर कधीच उघडपणे बोललेला नाही. पण गौतम गंभीर अनेक प्रसंगी महेंद्रसिंग धोनीबद्दल खुलेपणाने बोलतो.
ऑस्ट्रेलियात 2008 च्या सीबी मालिकेदरम्यान, गौतम गंभीर धोनीच्या रोटेशन पॉलिसीमुळे खूप नाराज होता. त्याने अनेक प्रसंगी असेही म्हटले होते की, रोटेशन पॉलिसी पाहून मला आश्चर्य वाटले. कारण सर्व खेळाडू चांगली कामगिरी करत होते, मग रोटेशन पॉलिसी का आणण्यात आली काय माहीत?
अजित आगरकर
भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज अजित आगरकर हा त्या खेळाडूंपैकी एक होता, ज्याने महेंद्रसिंग धोनीला आपल्या कारकीर्दीच्या समाप्तीसाठी सर्वात मोठा जबाबदार मानले. भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका गमावली, तेव्हा पहिल्यांदा अजित आगरकरने याबाबत सर्वात उघडपणे सांगितले होते. त्यानंतर एका वेबसाईटवर मुलाखत देताना तो म्हणाला होता की, निवडकर्त्यांनी “आता महेंद्रसिंग धोनीकडे कर्णधार आणि खेळाडू म्हणून बारकाईने पाहिले पाहिजे. जर त्याने पुढील सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली नाही तर त्याचा पर्याय शोधला पाहिजेत.”
युवराज सिंग
भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा युवराज सिंगच्या खास मित्रांपैकी एक मानला जातो. पण क्रिकेटच्या मैदानाबाहेर अनेक वेळा असा प्रत्यय आला आहे की महेंद्रसिंग धोनी आणि युवराज सिंग यांच्यातील संबंध चांगले नाहीत. एका मुलाखतीदरम्यानही युवराज सिंगने म्हटले होते की, “त्याला कर्णधाराचा पाठिंबा मिळत नव्हका. यामुळे तो संघात आत आणि बाहेर जात राहिला.” युवराज सिंगचे वडील योगराज सिंह अनेक प्रसंगी महेंद्रसिंग धोनीवर टीका करताना दिसले आहेत.
इरफान पठाण
इरफान पठाणने भारतीय संघात पदार्पण केले, तेव्हा सौरव गांगुली कर्णधार होता. इरफान पठाणने त्याच्या नेतृत्त्वाखाली पहिल्या तीन-चार वर्षांत चमकदार कामगिरी केली. तो पाकिस्तानच्या फलंदाजांना मैदानावर खूप त्रासदायक ठरायचा. पण धोनीच्या नेतृत्वाखाली इरफान पठाणला जास्त संधी देण्यात आली नाही आणि तो आत-बाहेर होत राहिला. इरफान पठाणच्या फॉर्ममध्ये चढ-उतार येत असायचे. तरीही त्याने एका मुलाखतीत, त्याला त्यावेळी महेंद्रसिंग धोनीचा पाठिंबा मिळत नसल्याचे म्हटले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
ओव्हल कसोटीत घडला इतिहास!! पहिल्यांदाच ‘या’ धावसंख्येवर बाद झाले तब्बल ४ फलंदाज
रहाणे आऊट ऑफ फॉर्म आहे, म्हणून नव्हे तर ‘या’ कारणामुळे रवींद्र जडेजाला मिळाली ५ व्या क्रमांकावर बढती
“तो असायला हवा होता”, चौथ्या दिवशी भारतीय गोलंदाज अपयशी ठरल्याने चाहत्यांना आली अश्विनची आठवण