---Advertisement---

या भारतीय गोलंदाजांनी घेतल्या आहेत विश्वचषकातील एका सामन्यात ५ विकेट्स

---Advertisement---

बर्मिंगहॅम। आज(30 जून) विश्वचषक 2019 स्पर्धेत इंग्लंड विरुद्ध भारत संघात 38 वा सामना एजबस्टन स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 7 बाद 337 धावा केल्या आहेत. तर भारताकडून मोहम्मद शमीने 10 षटके गोलंदाजी करताना 69 धावा देऊन 5 विकेट घेत शानदार कामगिरी केली.

त्याने या सामन्यात जॉनी बेअरस्टो, जो रुट, इयान मॉर्गन, जॉस बटलर आणि ख्रिस वोक्स यांना बाद केले. त्यामुळे तो विश्वचषक इतिहासात एका सामन्यात 5 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारा भारताचा सहावा गोलंदाज ठरला आहे.

याआधी कपिल देव, रॉबिन सिंग, वेंकटेश प्रसाद, आशिष नेहरा आणि युवराज सिंग या भारतीयांनी विश्वचषकातील एका सामन्यात 5 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. यातील आषिश नेहराने 2003 च्या विश्वचषकात इंग्लंड विरुद्ध 6 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. अन्य सर्व गोलंदाजांनी प्रत्येकी 5 विकेट्स घेतल्या आहेत.

याबरोबरच शमी हा विश्वचषकात सलग तीन सामन्यात चार किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारा भारताचा पहिलाच गोलंदाज ठरला आहे. त्याने या सामन्याआधी याच विश्वचषकात अफगाणिस्तान आणि विंडीज विरुद्ध प्रत्येकी 4 विकेट्स घेतल्या आहेत.

आज इंग्लंडकडून बेअरस्टोने सर्वाधिक 111 धावांची शतकी खेळी केली. तसेच जेसन रॉयने 66 धावांची आणि बेन स्टोक्सने 79 धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याचबरोबर भारताकडून शमी व्यतिरिक्त जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादवने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

वनडे विश्वचषकातील एका सामन्यात 5 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज-

1983 – कपिल देव (5 विकेट्स, ऑस्ट्रेलिया)

1999 – रॉबिन सिंग (5 विकेट्स, श्रीलंका)

1999 – व्यंकटेश प्रसाद (5 विकेट्स, पाकिस्तान)

2003 – आशिष नेहरा (6 विकेट्स, विरुद्ध इंग्लंड)

2011 – युवराज सिंग (5 विकेट्स, विरुद्ध आयर्लंड)

2019 – मोहम्मद शमी (5 विकेट्स, विरुद्ध इंग्लड)

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

राखीव क्षेत्ररक्षक रविंद्र जडेजाने घेतला जेसन रॉयचा अफलातून झेल, पहा व्हिडिओ

विश्वचषक इतिहासात असा पराक्रम करणारा मिशेल स्टार्क पहिला गोलंदाज

संपूर्ण यादी – विश्वचषक इतिहासात आत्तापर्यंत या गोलंदाजांनी घेतली आहे हॅट्रिक

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment