---Advertisement---

क्रिकेटपासून 6 महिने दूर राहिलेल्या जडेजाचा धमाका! कांगारूंच्या बत्त्या गुल करत साकारले विकेट्सचे पंचक

Ravindra-Jadeja
---Advertisement---

गुरुवारी (दि. 9 फेब्रुवारी) नागपूर येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. यादरम्यान भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांच्या नाकी नऊ आणल्या. विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव हा अवघ्या 177 धावांवर संपुष्टात आला. यामध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेत सर्वोत्तम कामगिरी करण्याचा मान रवींद्र जडेजा याला मिळाला.

या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) याने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी त्यांची सुरुवात अत्यंत खराब झाली. त्यांच्या पहिल्या दोन विकेट्स 3 षटकाच्या आत पडल्या. उस्मान ख्वाजा (1) आणि डेविड वॉर्नर (1) यांना चांगली कामगिरी करता आली नाही. यातील ख्वाजाची विकेट मोहम्मद सिराजने घेतली, तर वॉर्नरची विकेट मोहम्मद शमी याने घेतली. यानंतर भारतीय संघाचा अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने विकेट्स घेण्याचे काम सुरू केले.

रवींद्र जडेजाच्या 5 विकेट्स
रवींद्र जडेजाने ऑस्ट्रेलियाच्या डावादरम्यान विकेट्सचे पंचक पूर्ण केले. त्याने डावातील पहिली विकेट मार्नस लॅब्यूशेन (Marnus Labuschagne) याच्या रूपात घेतली. त्याने लॅब्यूशेनला 36व्या षटकाच्या 5व्या चेंडूवर 49 धावांवर बाद केले. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर म्हणजेच 36व्या षटकाच्या 6व्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाच्या मॅट रेनशॉ याला शून्यावर पायचीत केले. पुढे स्टीव्ह स्मिथ यालादेखील 42व्या षटकाच्या 6व्या चेंडूवर 37 धावांवर तंबूत धाडले.

https://twitter.com/ICC/status/1623611456033026050

जडेजा 59व्या षटकातील 5वा चेंडू टाकत असताना टोड मर्फी यालाही शून्यावर पायचीत बाद करत चौथी विकेट घेतली. त्यानंतर विकेट्सचे पंचक पूर्ण करण्यासाठी जडेजाला फक्त 1 विकेटची गरज होती. ती त्याने 63वे षटक टाकताना तिसऱ्या चेंडूवर 31 धावांवर खेळत असलेल्या पीटर हँड्सकाँब याला पायचीत करत बाद केले.

कसोटीतील 11वे पंचक
अशाप्रकारे जडेजाने त्याचे कसोटीतील पंचक पूर्ण केले. हे त्याचे कसोटीतील 11वे पंचक होते. महत्त्वाचं म्हणजे, जडेजाने तब्बल 6 महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करत ही कामगिरी करून दाखवली. जडेजाने या डावादरम्यान 22 षटके गोलंदाजी करत 47 धावा खर्च केल्या आणि 5 विकेट्स स्वत:च्या नावावर नोंदवल्या.

जडेजाव्यतिरिक्त भारताकडून आर अश्विन यानेही 3 विकेट्स घेतल्या. तसेच, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी 1 विकेट खिशात घातली. (Five wicket haul for Jadeja in his first match for India after 6 months this is 11th time)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारत वि. ऑस्ट्रेलिया । जडेजा-आश्विनच्या फिरकीची कमाल, 177 धावांत आटोपला ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव
जडेजाचे दमदार पुनरागमन, चेंडू हातात घेताच तीन ऑस्ट्रेलियन फलंदाजांना धाडले तंबूत

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---