न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज दरम्यानचा पहिला टी-२० सामना ऑकलंड येथील ईडन पार्क मैदानावर शुक्रवारी(२७ नोव्हेंबर) खेळण्यात आला. या सामन्यात लॉकी फर्ग्युसनच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने वेस्ट इंडिजवर, डकवर्थ लुईस नियमानुसार ५ गडी राखून मात केली. या सामन्यात लॉकी फर्ग्युसनने न्यूझीलंडच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
लॉकी फर्ग्युसनने या सामन्यात ४ षटके गोलंदाजी करताना सर्वात कमी २१ धावा देत ५ गडी बाद केले. त्याचबरोबर ही त्याची टी-२० कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी ठरली. टी-२० क्रिकेटमध्ये न्यूझीलंडकडून एका सामन्यात ५ विकेट्स घेणारा तो टीम साउदी नंतर दुसरा गोलंदाज ठरला.
टीम साउदी हा न्यूझीलंडकडून टी-२० मध्ये एका सामन्यात ५ विकेट्स घेणारा पहिला आहे. त्याने २६ डिसेंबर २०१० रोजी ऑकलंड येथील ईडन पार्क मैदानावरच पाकिस्तान विरुद्ध टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात ४ षटकात १८ धावा देत ५ विकेट्स मिळवल्या होत्या.
स्टार फलंदाजांना फर्ग्यूसनने धाडले माघारी
शुक्रवारी झालेल्या सामन्यात फर्ग्यूसनने आंद्रे फ्लेचर, शिमरॉन हेटमायर, निकोलस पूरन, फॅबियन ऍलेन आणि किमो पॉल यांना बाद केले. पण वेस्ट इंडिजकडून कर्णधार कायरन पोलार्डने कर्णधाराला साजेशी अशी ३७ चेंडूत नाबाद ७५ धावांची खेळी केली. त्यामुळे वेस्ट इंडिजने पावसामुळे १६-१६ षटकांचा करण्यात आलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना १७९ धावांचा डोंगर उभा केला.
प्रतिउत्तरादाखल न्यूझीलंडने १५.२ षटकात ५ बाद १७९ धावा केल्यानंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे अखेर न्यूझीलंडला डकवर्थ लूईस नियमानुसार विजयी घोषित करण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या –
“विराट, मला RCB मध्ये स्थान मिळेल का?” व्हिडिओ शेअर करत स्टार फुटबॉलपटूचा प्रश्न
…म्हणून ऑस्ट्रेलियन फलंदाज भारतीय गोलंदाजांची धुलाई करत असताना हार्दिकने केली नाही गोलंदाजी
ऑस्ट्रेलियन संघाला मोठा धक्का! ‘हा’ खेळाडू दुसऱ्या वनडेला मुकण्याची शक्यता