fbpx
Tuesday, January 26, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

…म्हणून ऑस्ट्रेलियन फलंदाज भारतीय गोलंदाजांची धुलाई करत असताना हार्दिकने केली नाही गोलंदाजी

November 27, 2020
in क्रिकेट, टॉप बातम्या, भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा
0
Photo Courtesy: Twitter/ BCCI

Photo Courtesy: Twitter/ BCCI


ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने शुक्रवारी(२७ नोव्हेंबर) भारतीय संघाला पहिल्या वनडे सामन्यात ६६ धावांनी पराभूत केले. या सामन्यात भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्याने एकाही षटकात गोलंदाजी केली नाही. त्यामुळे अनेकांना त्याने गोलंदाजी न करण्याबाबत प्रश्न पडला आहे. पण आता हार्दिकनेच याबद्दल भाष्य केले आहे.

पहिल्या वनडे सामन्यानंतर हार्दिक म्हणाला, ‘ही एक प्रक्रिया आहे. मी एका दीर्घ-काळाच्या दृष्टीने याकडे पहात आहे. जेणेकरुन मी महत्त्वपूर्ण सामन्यांत संपूर्ण क्षमतेने गोलंदाजी करु शकेल. विश्वचषक स्पर्धा पुढे येत आहेत. खुप महत्त्वाच्या मालिका खेळायच्या आहेत.’

‘मी दीर्घ-काळासाठी योजना आखण्याचा विचार करत आहे, अल्प-काळासाठी नाही जिथे मी स्वत: ला दमवून नसलेली दुखापत करुन घेईल. त्यामुळे प्रक्रियेचे अनुसरण करणे योग्य आहे. मी सांगू शकत नाही की मी कधी गोलंदाजी करेल. पण त्यावर काम सुरु आहे. मी नेटमध्ये गोलंदाजी करत आहे. मी फक्त सामन्यांत गोलंदाजी करण्यासाठी तयार नाही. पण मी गोलंदाजी करत आहे. हे सर्व आंतरराष्ट्रीय स्तरावर हव्या असलेल्या आत्मविश्वास आणि कौशल्याबाबत निगडीत आहे,’ असेही हार्दिक म्हणाला.

खरंतर गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये इंग्लंडमध्ये हार्दिकच्या पाठीवर शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे या शस्त्रक्रियेनंतर लगेचच गोलंदाजी करणे हार्दिकसाठी शक्य नव्हते. त्यामुळे त्याने यंदाच्या आयपीएल हंगामातही गोलंदाजी केली नव्हती.

फलंदाजीत दिले महत्त्वाचे योगदान

असे असले तरी हार्दिकने शुक्रवारी फलंदाजीत महत्त्वाचे योगदान दिले. त्याने भारताकडून ३७५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ९० धावांची झंझावाती खेळी केली. हार्दिकने ही ९० धावांची खेळी ७६ चेंडूत ७ चौकार आणि ४ षटकारांसह केली. त्याने शिखर धवनसह ५ व्या विकेटसाठी १२८ धावांची शतकी भागीदारीही रचली. शिखरने ७४ धावांची खेळी केली. पण या दोघांच्या अर्धशतकी खेळीनंतरही भारताला ५० षटकात ३०८ धावाच करता आल्याने ६६ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.

तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार ऍरॉन फिंचने ११४ आणि स्टिव्ह स्मिथने १०५ धावांची शतकी खेळी केली. तर वॉर्नरने ६९ धावांची अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने ५० षटकात ६ बाद ३७४ धावा केल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या –

ऑस्ट्रेलियन संघाला मोठा धक्का! ‘हा’ खेळाडू दुसऱ्या वनडेला मुकण्याची शक्यता

टीम इंडियाला शतकी तडाखा दिलेला फिंच आरसीबी फॅन्सकडून ट्रोल; मीम्स झाले व्हायरल

…तर तुम्हाला देशाबाहेर काढू! न्यूझीलंडने दिली पाकिस्तानी संघाला ‘लास्ट वॉर्निंग’


Previous Post

आयएसएल २०२०: एटीके मोहन बागानचे कोलकाता डर्बीत वर्चस्व

Next Post

“विराट, मला RCB मध्ये स्थान मिळेल का?” व्हिडिओ शेअर करत स्टार फुटबॉलपटूचा प्रश्न

Related Posts

Photo Courtesy: www.iplt20.com
टॉप बातम्या

आयपीएल २०२१ लिलावाची तारीख ठरली ! ‘या’ ठिकाणी होणार लिलाव

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

“मिचेल स्टार्क ऐवजी दुसऱ्या गोलंदाजाला संघात स्थान द्या”, माजी कर्णधाराने केली मागणी

January 25, 2021
टॉप बातम्या

क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांची ‘आझम कॅम्पस’ ला भेट 

January 25, 2021
टॉप बातम्या

‘बाऊंसर’ चेंडूवर येणार बंदी ? ‘हे’ आहे कारण

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

बांगलादेशने दिला वेस्ट इंडिजला ‘व्हाईटवॉश’, तिसऱ्या सामन्यात केली एकतर्फी मात

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@RSWorldSeries
टॉप बातम्या

पुन्हा घुमणार ‘सचिन..सचिन’ चा आवाज; सुरू होणार ‘ही’ मोठी स्पर्धा

January 25, 2021
Next Post
Photo Courtesy: www.iplt20.com

“विराट, मला RCB मध्ये स्थान मिळेल का?” व्हिडिओ शेअर करत स्टार फुटबॉलपटूचा प्रश्न

Photo Courtesy: Twitter/ ICC

'असा' कारनामा करणारा फर्ग्यूसन न्यूझीलंडचा केवळ दुसराच गोलंदाज

Photo Courtesy: Twitter/ BCCI

भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिन्ही क्रिकेट मालिकेत होईल पराभव, माजी कर्णधाराची भविष्यवाणी

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.