---Advertisement---

प्रमोशन फेरीत अहमदनगर संघाचा विजयाचा पचं

---Advertisement---

पुणे (23 मार्च 2024) – आज दुसरी लढत अहमदनगर विरुद्ध रत्नागिरी यांच्यात झाली. अहमदनगर संघ 4 विजयासह पहिल्या क्रमांकावर होता तर रत्नागिरी संघ 4 पैकी 2 विजयासह चौथ्या क्रमांकावर होता. रत्नागिरी संघाने जोरदार सुरुवात अहमदनगरच्या प्रफुल झावरे व शिवम पठारे ला शांत ठेवले होते. त्यानंतर मात्र प्रफुल झावरे व शिवम पठारे यांनी चतुरस्त्र चढाया करत गुण मिळवले. अहमदनगर संघाने पलटवार करत रत्नागिरी संघाला ऑल आऊट केले.

अहमदनगरच्या प्रफुल झावरे ने आपला आक्रमक खेळ चालू ठेवत मध्यंतरापूर्वी रत्नागिरी संघाला पुन्हा एकदा ऑल आऊट करत सामन्यात आघाडी मिळवली. मध्यंतराला 26-10 अशी आघाडी रत्नागिरी संघाकडे होती. अहमदनगर कडून संकेत खलाटे ने बचावात चांगला खेळ केला. मध्यंतरा नंतर अहमदनगर संघाने पुन्हा एकदा रत्नागिरी संघाला ऑल आऊट करत सामन्यावर पकड मजबूत केली. रत्नागिरीच्या बचावफळीकडून खूप चुका बघायला मिळाला.

अहमदनगर संघाने सामना 52-25 असा जिंकला. अहमदनगर संघाचा प्रमोशन फेरीतील सलग पाचवा विजय ठरला. टॉप 2 मध्ये स्थान जवळपास पक्के केले आहे. अहमदनगर कडून प्रफुल झावरे ने चढाईत सर्वाधिक 14 गुण मिळवले. तर आशिष यादव व शिवम पठारे यांनी त्याला चांगली साथ दिली. संकेत खलाटे ने पकडीत सर्वाधिक 4 गुण तर सोमनाथ बेडगे ने पकडीत 3 गुण मिळवले. रत्नागिरी कडून अमरसिंग कश्यप चढाईत 6 गुण तर निलेश शिंदे ने पकडीत 4 गुण मिळवले. (Five wins for Ahmednagar team in the promotion round)

बेस्ट रेडर- प्रफुल झावरे, अहमदनगर
बेस्ट डिफेंडर- संकेत खलाटे, अहमदनगर
कबड्डी का कमाल – शिवम पठारे व सोमनाथ बेडगे, अहमदनगर

महत्वाच्या बातम्या – 
शरद पवारांकडून मिळाली होती सचिनला फॉफर, मास्टर ब्लास्टरनं सुचवलं ‘या’ दिग्गजाचं नाव
हंगामातील पहिला सामना जिंकण्यासाठी पंजाबपुढे 175 धावांचे आव्हान, ‘इतक्या’ धावांची खेळी करत पंतचे कमबॅक

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---