“महाराष्ट्र खेळणार तर राष्ट्र जिंकणार”
“स्वस्थ रहेगा तन तभी तो स्वस्थ रहेगा मन”
ह्या सर्व घोषणा आज तुम्ही टीव्ही, रेडिओ, वर्तमानपत्र इत्यादी ठिकाणी वाचल्या,
ऐकल्या, पाहिल्या असतील. ह्या सर्व घोषणा (स्लोगन्स) आहेत भारत सरकारच्या
‘खेलो इंडिया’ ह्या महत्वाकांक्षी अभियानासंदर्भातील.
भारताला क्रीडाविश्वातील महाशक्ती बनविण्यासाठी केंद्र सरकारने ह्या महत्वपूर्ण
अभियानाची सुरुवात केली ज्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरांवरील विविध स्पर्धांमधील
भारताला मिळणाऱ्या पदकांचा दुष्काळ तर दूर होणारच आहे. महत्वाचे म्हणजे
भारताचे प्रधानमंत्री व क्रीडामंत्री ह्यासाठी प्रयत्नशील आहेत की भारतामध्ये
क्रीडासंस्कृती आणखीन रुजावी व मजबूत व्हावी कारण बालकांच्या शारीरिक व
मानसिक विकासासाठी खेळ किती महत्वाचा आहे हे ते जांणतात.
थोडक्यात जाणून घेऊया काय आहे ‘खेलो इंडिया’ अभियान
३१ जानेवारी २०१८ साली भारताचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी खेलो इंडिया
स्कूल गेमचे उदघाटन दिल्लीच्या इंदिरा गांधी स्टेडियम मध्ये केले.
ह्या मोहिमेचा प्रमुख उद्देश क्रीडा संस्कृती भारतीय समाजात खोलवर रुजवणे व
भविष्यातील विविध स्पर्धांसाठी सर्वोत्तम भारतीय खेळाडू तयार करणे हे आहे.
ह्या अभियानाअंतर्गत १७ वर्षाखालील वयोगटातील विविध खेळांचे आयोजन राष्ट्रीय
स्तरावर करण्यात येईल ज्यात प्रतिवर्षी सर्वोत्तम मुला/मुलींना ५,००,००० रुपये
प्रतिवर्ष अशी वार्षिक शिष्यवृत्ती ८ वर्षांकरिता मिळणार असून, ह्या सर्व उदयोन्मुख
खेळाडूंना भविष्यातील विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांची तयारी करणे अधिक सोपे
जाणार आहे. भारतीय क्रीडाविश्वातील इतिहासात खेळांच्या विकासासाठी एवढी
भरघोस आर्थिक मदत व सहकार्य प्रथमच लाभणार आहे.
खेलो इंडिया मोहिमेच्या या प्रथम वर्षी एक मजबूत व लहान मुलांना खेळासाठी
प्रोत्साहित करणारा ‘खेलोगे कुदोगे बनोगे लाजवाब’ असा संदेश देण्यात आला.
ह्याच अंतर्गत मिनिट्स और नाराही देण्यात आला म्हणजेच जर प्रत्येक मूल
५ मिनिट अजून खेळले तर ऑलिम्पिक सारख्या आंतरराष्ट्रीय व प्रतिष्ठेच्या
स्पर्धांमध्ये भारताला ५० पदकं निश्चितच जास्त मिळतील.
ह्या अभियानाअंतर्गत भरविण्यात येणार्या विविध स्पर्धा ह्यावर्षी म्हणजेच सन
२०१९ साली पुण्यातील श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बालेवाडी पुणे येथे पार
पडणार असून ह्या स्पर्धा ९ जानेवारी ते २० जानेवारी दरम्यान पार पडणार आहेत,
या खेळांमध्ये २९ राज्य व ७ केंद्रशासित प्रदेशांमधून सुमारे १०,००० व्यक्ती
सहभाग नोंदवणार आहेत. सुमारे ६२०० खेळाडू, १८०० तांत्रिक कर्मचारी, १०००
स्वयंसेवक व १००० इतर कर्मचारी समाविष्ट असतील.
खेलो इंडियाच्या ह्या पार पडणाऱ्या द्वितीय सत्रात १८ विविध क्रीडाप्रकारातील
विविध स्पर्धा १७ वर्ष वयोगटाखालील व २१ वर्ष वयोगटाखालील खेळाडूंसाठी
आयोजित करण्यात येतील.
पुण्यातील शिवछत्रपती स्टेडियम म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे इथे पार पडणाऱ्या ह्या
अभियानाचे व स्पर्धांचे उदघाटन ९ जानेवारी २०१९ ला होणार आहे.
खेलो इंडिया २०१९ : बालेवाडी स्टेडियम, म्हाळुंगे, पुणे येथे पार पडणार्या ह्या क्रीडा
सोहळ्याची थोडक्यात रूपरेषा पुढील प्रमाणे :
हॉकी स्पर्धा (मुलांची) : ७ जानेवारी ते १५ जानेवारी
स्थळ : हॉकी ग्राउंड (MHA, मुंबई हॉकी असोसिएशन, मुंबई)
जिम्नॅस्टिक्स : ८ जानेवारी ते १३ जानेवारी
स्थळ – जिम हॉल, श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे
जुडो : ९ जानेवारी ते १३ जानेवारी
स्थळ : टेबल टेनिस हॉल, श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे
वेटलिफ्टिंग : ९ जानेवारी ते १५ जानेवारी
स्थळ : वेटलिफ्टिंग हॉल, श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे
रेसलिंग : ९ जानेवारी ते १२ जानेवारी
स्थळ : बॉक्सिंग हॉल,श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे
अथेलेटिक्स : १० जानेवारी ते १३ जानेवारी
स्थळ : मुख्य स्टेडियम अर्थात श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, म्हाळुंगे-
बालेवाडी, पुणे
बॅडमिंटन : १० जानेवारी ते १३ जानेवारी
स्थळ : बॅडमिंटन हॉल A, श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे
फुटबॉल : १० जानेवारी ते १९ जानेवारी
स्थळ : फुटबॉल ग्राउंड, श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे
शूटिंग : १० जानेवारी ते १६ जानेवारी
स्थळ : शूटिंग रेंज, श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे
स्विमिंग : १० जानेवारी ते १५ जानेवारी
स्थळ : स्विमिंग पूल, श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे
बॉक्सिंग : १३ जानेवारी ते १९ जानेवारी :
स्थळ : बॉक्सिंग हॉल + बॅडमिंटन हॉल B, श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स,
म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे
खो-खो : १३ जानेवारी ते १७ जानेवारी
स्थळ : खो खो ग्राउंड,श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे
कबड्डी : १४ जानेवारी ते १८ जानेवारी
स्थळ : बॅडमिंटन हॉल B, श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे
टेनिस : १४ जानेवारी ते १९ जानेवारी
स्थळ : टेनिस कोर्ट, श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे
व्हॉलीबॉल : १४ जानेवारी ते २० जानेवारी
स्थळ : बॅडमिंटन हॉल+जिम हॉल A , श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, म्हाळुंगे-
बालेवाडी, पुणे
बास्केटबॉल : १५ जानेवारी ते १९ जानेवारी
स्थळ : टेबल टेनिस हॉल, श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, म्हाळुंगे-बालेवाडी,
पुणे
टेबल टेनिस : १६ जानेवारी ते २० जानेवारी
स्थळ : वेट लिफ्टिंग हॉल, श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, म्हाळुंगे-बालेवाडी,
पुणे
तिरंदाजी (Archery) : १७ जानेवारी ते २० जानेवारी
स्थळ : आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट (ASI), घोरपुरी, म्हाळुंगे, पुणे
महत्त्वाच्या बातम्या-
–१९ तासांत ४ लाख लाईक्स मिळालेला पंतचा तो फोटो पाहिला का?
–भारतीय फलंदाजांपेक्षा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी केली जादा शतकं
–रिषभ पंतच्या रूपाने टीम इंडियाला मिळाला ऍडम गिलख्रिस्ट…
–ऑस्ट्रेलिया विरुद्ध ३ विकेट्स घेणाऱ्या कुलदीपसाठी ऑस्ट्रेलियाच्याच दिग्गजाचा सल्ला ठरला मोलाचा