भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना पार पडला. कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड संघांमध्ये चुरशीची लढत पार पडली. हा सामना अनिर्णित राहिला असून या सामन्यात संघाचे नेतृत्व करत असलेला अजिंक्य रहाणे पुन्हा एकदा फ्लॉप ठरला आहे. ज्यामुळे सर्वच स्तरातून त्याची टीका केली जात आहे.
न्यूझीलंड विरुद्ध पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणेकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. परंतु, तो पुन्हा एकदा साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे. पहिल्या डावात फलंदाजी करताना त्याला ६३ चेंडूंमध्ये ६ चौकारांच्या साहाय्याने ३५ धावा केल्या होत्या, तर दुसऱ्या डावात तो अवघ्या ४ धावा करत माघारी परतला होता.
तसेच गेल्या २० डावात देखील त्याला हवी तशी कामगिरी करता आली नाहीय, गेल्या २० डावात त्याने अनुक्रमे ४, ३७, २४, १, ०, ६७, १०, ७, २७, ४९, १५, ५, १, ६१, १८, १०, १४, ०, ३५ आणि ४ धावा केल्या आहेत.
एक वर्षांपूर्वी झळकावले होते शतक
विराट कोहलीच्या अनुपस्थितीत २०२०-२१ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर देखील अजिंक्य रहाणेला भारतीय संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते. त्यावेळी मेलबर्नमध्ये खेळल्या गेलेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणेने शेवटचे शतक झळकावले होते. या शतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघावर ८ गडी राखून विजय मिळवला होता.
अशी आहे अजिंक्य रहाणेची कसोटी कारकीर्द
भारतीय कसोटी संघाचा नियमित उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने आतापर्यंत एकूण ७८ कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याला ३९. ६३ च्या सरासरीने ४७५६ धावा करण्यात यश आले आहे. यादरम्यान त्याने १२ शतक आणि २४ अर्धशतक झळकावले आहेत. तसेच १८८ धावा ही त्याची कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळी आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
कृणालच्या राजीनाम्यानंतर केदारकडे बडोद्याचे नेतृत्व; विजय हजारे ट्रॉफीत सांभाळणार जबाबदारी
वृद्धिमान साहाकडून सलामी, तर ‘या’ खेळाडूला करा संघाबाहेर, माजी भारतीय क्रिकेटपटूने सुचवला पर्याय
पॅट कमिन्सचा मोठा खुलासा! कर्णधारपद सोपवण्यापूर्वी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ठेवली होती ‘ही’ अट