---Advertisement---

नाद खुळा! क्रिकेटमध्ये असा कॅच तुम्ही पाहिला नसेल!

On: रविवार, मार्च 9, 2025 8:36 PM
---Advertisement---

यंदाच्या चॅम्पियन्स ट्राॅफीचा अंतिम सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात खेळवला जात आहे. या सामन्यात पहिल्या डावात खेळताना किवी संघाने मर्यादित 50 षटकात 251 धावा केल्या. ज्याचा पाठलाग भारताने दमदार सुरुवात केली आहे. पहिल्या विकेटसाठी रोहित शर्मा आणि शुबमन गिलने 105 धावांची मोलाची भागीदारी केली.

मात्र संघाला 19व्या षटकाच्या चाैथ्या चेंडूवर गिलच्या रुपाने पहिला धक्का बसला. मिचेल सँटनरने गिलला बाद केले. ही विकेट जरी सँटनरने घेतली असली तरी ती ग्लेन फिलिप्सच्या नावाने जाते. कारण त्याने गिलचा अप्रतिम कॅच घेतला. हा कॅच त्याने एका हातात हवेत उडून घेतला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हारयरल होत आहे.

शुबमन गिलने 50 चेंडूत 31 धावा करुन बाद झाला. त्याने सुरुवातीच्या षटकात रोहित शर्माला चांगली साथ दिली. मात्र त्याला मोठी खेळी करता आली नाही. शुबमन गिलनंतर फलंदाजीस आलेला विराट कोहलीही स्वस्तात बाद झाला. त्याला मायकेल ब्रेसवेलने 1 धाववर बाद केले. 

दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हन-

भारत- रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती.

न्यूझीलंड- रचिन रवींद्र (कर्णधार) विल यंग, केन विल्यमसन, डॅरेल मिशेल, टाॅम लॅथम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, मायकेल ब्रेसवेल, नॅथन स्मिथ, काइल जेमीसन, विल्यम ओरोर्के.

हेही वाचा-

इकडे लक्ष द्या! फक्त 28 बॅाल्समध्ये या क्रिकेटरने केलंय शतक!
रोहितने षटकार ठोकून गाठले नवे शिखर; बाबर आझमलाही टाकले मागे
IND vs NZ: अंतिम सामन्यात कुलदीपची जादू चालली, किवी संघाला पाणी पाजलं.!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---