जगभरात ‘फ्लायिंग सिख’ म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे प्रसिद्ध भारतीय धावपटू, मिल्खा सिंग यांची गुरुवारी ऑक्सिजनची पातळी खालावली होती. त्यांनतर त्यांना चंदीगडस्थित एका कोविड रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्यांना आयसीयू वॉर्ड मध्ये भरती करण्यात आले आहे. मिल्खा सिंग हे काही दिवसांपूर्वीच कोरोनातून ठीक होऊन घरी परतले होते.
पिजीआयचे प्रवक्ते, प्रोफेसर अशोक कुमार यांनी एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, “ऑक्सिजनची पातळी खालावल्यामुळे ‘फ्लायिंग सिख’ यांना आज (३ जून) दुपारी ३ वाजून ४५ मिनिटांनी रुग्णालयात हलवण्यात आले होते. परंतु आता त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.”
कोरोनावर केली मात
वयाची नव्वदी पार केलेल्या मिल्खा सिंग यांना ३१ मे रोजी रुग्णालयातून सुट्टी मिळाली होती. २४ तारखेला त्यांना खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. जवळपास एक आठवडा रुग्णालयात राहिल्यानंतर, त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली होती. त्यानंतर ३१ तारखेला त्यांना घरी सोडण्यात आले होते. त्यांच्या पत्नीचा देखील कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.
पाकिस्तानमध्ये झाला होता जन्म
मिल्खा सिंग यांचा जन्म २० नोव्हेंबर,१९२९ मध्ये गोविंदपुरा स्थित शीख कुटुंबात झाला होता. काही वर्ष देशासाठी कर्तव्य बजावल्यानंतर त्यांनी क्रॉस कंट्री स्पर्धेत सहभाग घेतला होता.या शर्यतीत तब्बल ४०० अधिकारी एकसोबत धावले होते.ज्यामध्ये मिल्खा सिंग हे सहाव्या क्रमांकांवर आले होते.
भारत सरकारकडून मिळाला आहे पद्मश्री पुरस्कार
मिल्खा सिंग यांनी १९५६ मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत सहभाग घेतला होता.परंतु त्यांना या स्पर्धेत साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. परंतु १९५८ मध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी २०० आणि ४०० मीटरच्या स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. त्यांचे यश पाहून, भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
WTC Final: भारतीय संघाला सतावते आहे पुजाराची चिंता, ही उणीव ठरतेय डोकेदुखी
क्रिकेटच्या काळ्या अध्यायाचे खलनायक, अवघ्या ३२व्या वर्षी विमान अपघातात झाला दुर्दैवी मृत्यू