बीसीसीआयने पहिल्या-वहिल्या महिला प्रीमिअर लीग हंगामाची घोषणा केली आहे. या स्पर्धेतील पाच संघही ठरले आहेत. तसेच, या स्पर्धेचा लिलावही आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र, भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने तिचा इरादा आधीच स्पष्ट केला आहे. हरमनप्रीतने सांगितले आहे की, तिचे लक्ष लिलावावर नाही, तर महिला टी20 विश्वचषक 2023 स्पर्धेवर आहे.
‘विश्वचषक महत्त्वाचा’
रविवारी (दि. 5 फेब्रुवारी) हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिने माध्यमांशी बोलताना विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावर उत्तर दिले. ती म्हणाली की, “लिलावापूर्वी आम्हाला एक महत्त्वपूर्ण सामना खेळायचा आहे. आम्ही त्यावरच लक्ष देऊ. विश्वचषक इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा सर्वात महत्त्वपूर्ण आहे. आमचे लक्ष आयसीसी ट्रॉफीवर आहे. या गोष्टी येत-जात राहतील. मात्र, एक खेळाडू म्हणून तुमच्यासाठी काय योग्य आहे, हे तुम्हाला माहिती असते. तसेच, तुम्हाला कशाप्रकारे लक्ष केंद्रित करायचे आहे, हेदेखील माहिती असते.”
‘देशातील क्रिकेट सुधारण्यास मदत’
हरमनप्रीत पुढे बोलताना म्हणाली की, “आम्ही सर्व प्रौढ आहोत आणि आमच्यासाठी काय महत्त्वाचे आहे, हे आम्हाला माहिती आहे. लिलाव आमच्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. कारण, आम्ही दीर्घकाळापासून वाट पाहत आहोत. पुढील दोन-तीन महिने महिला क्रिकेटसाठी खूप महत्त्वाचे आहेत. आम्ही पाहिले आहे की, महिला बिग बॅश लीग आणि द हंड्रेड स्पर्धांनी कशाप्रकारे त्यांच्या देशातील क्रिकेट सुधारण्यात मदत केली आहे. अपेक्षा आहे की, आपल्या देशातही असेच होईल.”
“ही खूपच वेगळी भावना आहे. जेव्हा मला मोठ्या स्तरावर खेळण्याची संधी मिलाले, तेव्हा हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण होता. इतर युवा मुलींनाही हा अनुभव घेता येईल. क्रिकेट सुधारणे आणि त्याचा विकास करण्यासाठी ही मोठी संधी असेल,” असेही पुढे बोलताना हरमनप्रीत म्हणाली.
विशेष म्हणजे, महिला प्रीमिअर लीग 2023 (Womens Premier League 2023) स्पर्धेचा लिलाव 13 फेब्रुवारी रोजी होणार आहे. तसेच, महिला टी20 विश्वचषक 2023 (Womens T20 World Cup 2023) स्पर्धेत भारताला 12 फेब्रुवारी रोजी पाकिस्तान संघाचा सामना करायचा आहे. (focus on world cup despite wpl auction harmanpreet kaur read here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘मी आधी धोनीसाठी खेळलो, त्यानंतर देशासाठी…’, निवृत्तीच्या 2 वर्षांनंतर रैनाच्या मनातलं आलं ओठांवर
एक-दोन नाही, सहा ठोकलेत! इफ्तिखारने वहाब रियाजच्या एकाच ओव्हरमध्ये भिरकावले 6 षटकार, व्हिडिओ व्हायरल