स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोचा कोरोना अहवाल शनिवारी (३१ ऑक्टोबर) निगेटिव्ह आला. नेशन्स लीगमध्ये फ्रान्सविरुद्धच्या सामन्यानंतर त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यानंतर त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आढळला होता. म्हणून त्याला सेल्फ आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले. त्यामुळे रोनाल्डोला पोर्तुगालकडून एक आणि युव्हेंट्सकडून ४ सामने खेळता आले नाहीत.
रोनाल्डोच्या आरोग्याची माहिती देताना जुवेंट्स क्लबने सांगितले की, “क्रिस्टियानो रोनाल्डोची पुन्हा एकदा कोरोना चाचणी करण्यात आली. यावेळी त्याचा अहवाल निगेटिव्ह आला. हा खेळाडू जवळपास १९ दिवसांनंतर कोरोनाच्या विळख्यातून बाहेर आला आहे. आता त्याला सेल्फ आयसोलेशनमध्ये राहण्याची आवश्यकता नाही.”
. @Cristiano recovers from Covid-19https://t.co/4etecyAw0O pic.twitter.com/YPZSm0My8A
— JuventusFC 🇬🇧🇺🇸 (@juventusfcen) October 30, 2020
महत्त्वाचे म्हणजे, काही दिवसांपुर्वी रोनाल्डोच्या गैरहजेरीत लियोनल मेस्सीच्या बार्सिलोना संघाने युव्हेंट्स संघाला २-०ने मात दिली होती. पण कोरोनातून बरा झाल्यानंतर रविवारी रोनाल्डोने आपल्या जुवेंट्स संघाला ४-१च्या फरकाने स्पेझिया संघावर विजय मिळवून दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
पाहावं ते नवलंच! कॅमेराने दाखवला फुटबॉल म्हणून लाईन्समनचा टक्कल
मेस्सीच्या बार्सिलोना संघाच्या थरारक प्रदर्शनामुळे रोनाल्डोचा संघ चितपट, २ वर्षांनंतर घडलं ‘असं’
EPL: सोन-केनच्या जोडीची जबरा कामगिरी; नोंदवला हंगामातील नववा गोल
दिग्गज फुटबॉलपटूला कोरोनाची लागण; सोशल मीडियाद्वारे दिली माहिती