फिफा विश्वचषक २०१८ च्या बाद फेरीला शनिवार, ३० जूनपासून सुरवात होत आहे. ‘जी’ गटातून बाद फेरीसाठी बेल्जिअम आणि इंग्लंड हे दोन संघ पात्र झाले आहेत.
या गटात अव्वल स्थानी बेल्जिअम आहे. तर इंग्लंडने द्वितीय स्थान पटकावले आहे.
गट फेरीत दुसऱ्या स्थानी राहिल्याचा इंग्लंड संघाला विश्वचषकाच्या पुढील फेरीत चांगलाच लाभ होणार आहे.
बाद फेरीत इंग्लंडचा सामना बेभरवशी कोलंबिया संघाबरोबर मंगळवार,३० जुलैला होणार आहे.
जर या सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला तर स्पर्धेतील पुढील वाटचाल त्यांच्यासाठी सुलभ होणार आहे.
कोलंबियावर विजय मिळवला तर इंग्लंडला उपांत्य फेरीत स्वीडन किंवा स्विझर्लंड यांचा सामना करावा लागणार आहे.
गट फेरीतील दुसऱ्या स्थानामुळे इंग्लंड संघाची उपांत्य फेरीतील जागा जवळ जवळ नक्की झाल्यासारखे आहे.
गट फेरीत इंग्लंडने ३ सामन्यांपैकी २ सामन्यात विजय मिळवला आहे. तर एका सामन्यात इंग्लंडला पराभव पत्करावा लागला आहे.
यामधील ट्युनेशिया विरुद्धच्या सामन्यात इंग्लंडने २-१ असा विजय मिळवाला तर दुबळ्या पनामाला ६-१ अशा फरकाने पराभूत केले आहे. गट फेरीतील शेवटच्या सामन्यात मात्र इंग्लंडला बेल्जिअमकडून १-० असा पराभव पत्कारावा लागला.
बेल्जिअम विरुद्धचा सामना सोडला तर इंग्लंडची स्पर्धेतील आत्तापर्यंतची कामगिरी उत्तम झाली आहे.
इंग्लंडला फिफा विश्वचषकात आजपर्यंत एकच विश्वचषक जिंकता आला आहे. १९६६ साली इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकात इंग्लंडने विजेतेपद मिळवले होते.
त्यानंर इंग्लंडला पुन्हा फिफा विश्वचषकाला गवसणी घालता आली नाही. या स्पर्धेत इंग्लंड संघ लयीत दिसत आहे. जर इंग्लंडने उपांत्य फेरीचा अडथळा दूर केला तर या विश्वचषकात इंग्लंडला विजेतेपद मिळवण्याची उत्तम संधी असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
-विराट कोहलीच्या बाबतीत असे दुसऱ्यांदाच घडले!
-राहुल द्रविडचा हा सेल्फी पाहिलाय का? दोन दिग्गजांचा हा आहे…