फिफा विश्वचषकात गुरुवार दि. २८ जूनला झालेल्या एच गटच्या पोलंड विरुद्धच्या सामन्यात पराभूत होऊनही जपानने अंतिम १६ संघात स्थान मिळवले आहे.
आपल्या पहिल्या साखळी सामन्यात कोलंबियाकडून २-० असा पराभव तर सेनेगल विरुद्धचा सामना बरोबरीत सोडविल्यानंतर स्पर्धेतून बाहेर पडलेल्या पोलंडचा सहज पराभव करत जपान पुढील फेरीत स्थान मिळवेल याची अपेक्षा असताना पोलंडने अनपेक्षितपणे जपानचा १-० असा पराभव करत स्पर्धेचा शेवट गोड केला.
या सामन्यात पराभूत झालेल्या जपानने मात्र पुढील फेरीत जाण्यासाठी लागणारे आवश्यक गुण नसतानाही अंतिम १६ संघात स्थान मिळवत इतिहास घडविला.
जपानने संपूर्ण स्पर्धेत शिस्तप्रिय खेळ व वागणुकीने फेअर प्लेच्या आधारे पुढच्या फेरीची पात्रता मिळवली. तसेच फेअर प्लेच्या आधारावर बाद फेरी गाठणारा जपान पहिला संघ बनला.
कालच्या सामन्यानंतर एच गटात जपान आणि सेनेगलचे गुण समान झाले होते. त्यामुळे एच गटात दुसऱ्या स्थानासाठी पूर्ण स्पर्धेतील शिस्तप्रिय कामगिरी आणि यलो कार्डचा आधार घेत जपानने बाद फेरीची बाजी मारली.
या स्पर्धेच जपानला तीन यलो कार्ड तर सेनेगलला पाच यलो कार्ड मिळाले होते.
तसेच या फिफा विश्वचषकात बाद फेरीत प्रवेश मिळवणारा जपान हा पहिला अशिया खंडातील देश ठरला. या स्पर्धेत सहभागी झालेल्या इराण, सौदी अरेबिया आणि दक्षिण कोरिया हे अशिया खंडातील देश हे आधिच विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-टीम इंडिया आज करणार प्रयोग, दोन नव्या खेळाडूंना मिळणार संधी
-टीम इंडियासाठी टेन्शन वाढवणारी गोष्ट, मोठा खेळाडू करतोय पुनरागमन