रशिया येथे सुरु असललेल्या विश्वचषकात मंगळवार दि.२५ जून रोजी झालेल्या ड गटाच्या सामन्यात बलाढ्य अर्जेंटीनाने नायजेरीयाचा २-१ असा पराभव केला.
या विजयाबरोबर अर्जेंटीनाने स्पर्धेच्या अंतिम १६ संघामध्ये स्थान मिळवले.
या अटातटीच्या सामन्यात अर्जेंटीनाने दोन गोल करत बाजी मारली. यामध्ये अर्जेंटीनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीने १४ व्या मिनिटाला गोल करत आपल्या संघाला खाते उघडून दिले.
८६ व्या मिनिटाला १-१ असा बरोबरीत असणारा सामना मार्कोस रोजोने गोल करत अर्जेंटीनाच्या नावे केला.
या विजयाबरोबरच अर्जेंटीना संघाने अंतिम १६ संघात आपले स्थान पक्के केले.
गेल्या दोन सामन्यात अपेक्षित कामगिरी न करणाऱ्या मेस्सीने १४ मिनिटाला गोल करत स्पर्धेतील १०० वा गोल करण्याचा मान मिळवला.
२०१८ च्या फिफा विश्वचषकात पहिल्या सामन्यापासून अडखळणाऱ्या अर्जेंटीनावर स्पर्धेतून बाहेर पडण्याची शक्यता होती.
मात्र कालच्या सामन्यात मार्कोस रोजोने ८६ व्या मिनिटाला केलेल्या निर्णायक गोलने संघाला तारले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–टीम इंडिया उद्या खेळणार ऐतिहासिक शंभरावा टी२० सामना
–अनेक वर्ष अपुरे राहिलेले विराटचे स्वप्न उद्या होणार पुर्ण!