फिफा विश्वचषकाच्या माजी विजेत्या जर्मनीच्या २९ वर्षीय मेसट ओझीलने आंतरराष्ट्रीय फुटबॉमधून तडकाफडकी निवृत्तीची घोषणा केली आहे.
जर्मन चाहत्यांकडून सातत्याने होणाऱ्या वंशभेदाच्या टिकेमुळे मेसट ओझीलने हा टोकाचा निर्णय घेतला आहे.
मुळचा तुर्कीचा असलेल्या मेसट ओझीलने, तुर्कीचे राष्ट्रपती रजब तैयब एर्दोगन यांच्यासोबत काढलेल्या फोटोमुळे ओझीलवर सातत्याने वंशभेदी टिका होत होती.
नुकतेच रशियात पार पडलेल्या फिफा विश्वचषकात गतिजेत्या जर्मन संघाला गट फेरीतूनच स्पर्धेतून बाहेर पडावे लागले होते. त्यानंतर ओझीलवरील टिकेची धार आणखी वाढली होती.
२९ वर्षीय मेसट ओझीलने आंतरराष्ट्रीय फुटबॉमधून आपण निवृत्त होत असल्याची ट्विटरवरुन घोषणा केली आहे.
ओझीलने ट्विटरवर एका पत्राचा फोटो शेअर करत आपल्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल कारकिर्दीला पूर्णविराम देत असल्याचे सांगितले.
The past couple of weeks have given me time to reflect, and time to think over the events of the last few months. Consequently, I want to share my thoughts and feelings about what has happened. pic.twitter.com/WpWrlHxx74
— Mesut Özil (@M10) July 22, 2018
“गेल्या काही महिन्यात घडलेल्या घटनांचा, दोन आठवडे विचार करुन मी थांबण्याचा निर्णय घेतला आहे. मी या पत्रातून माझ्या भावना व्यक्त केल्या आहेत.” असे मेसट ओझील आपल्या ट्विटमध्ये म्हणाला.
जर्मनीच्या संघातून मिडफिल्डर म्हणून खेळणाऱ्या ओझीलने, ९२ सामन्यांमध्ये जर्मनीचे प्रतिनिधीत्व केले आहे. यामध्ये ओझीलने २३ गोल केले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-भुवनेश्वर कुमार नसला तरी भारतीय संघाला फरक पडणार नाही- झहीर खान