राजकारण, खेळ आणि सिनेमा या तीन गोष्टींना संपूर्ण जगात खूप वलय आहे. क्रीडाविश्वात प्रसिद्धीसोबतच खेळाडू अफाट पैसादेखील कमवत असतात. सगळ्याच खेळांत असे होते असे नक्कीच नाही परंतू काही खेळांत मात्र खेळाडू वारेमाप पैसे कमावतात. अशा खेळात खेळाडू चमकल्यास खेळाडूला करोडपती बनायला वेळ लागत नाही. मग तो खेळाडू क्रिकेटपटू असो की फुटबॉलपटू, त्याची जीवनशैली बदलुन जाते.
असाच एक खेळाडू म्हणजे पोर्तुगालचा दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तीयानो रोनाल्डो. जगभरात तो त्याच्या खेळाबरोबरच लाईफस्टाईलसाठीही प्रसिद्ध आहे. मागच्या वर्षी या पठ्ठ्याने जगातील सर्वात महागडी गाडी खरेदी केली, ज्या गाडीची किंमत तब्बल ७५ करोड रुपये होती. अशा या खेळाडूच्या जीवनशैलीबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.
पोर्तुगालचा सुपरस्टार ख्रिस्तीयानो रोनाल्डोने युरोपियन चॅम्पियन्सशिपच्या पत्रकार परिषदेदरम्यान आपल्या समोरील कोको कोलाची बाटली हटवली. त्यामुळे या दिग्गज कंपनीच्या बाजार मूल्यात ४ अरब डॉलरची अर्थात २९ हजार कोटींची घसरण झाली. या गोष्टीला प्रत्यक्ष- अप्रत्यक्षरित्या रोनाल्डो जबाबदार आहे. गेल्या १० वर्षांपेक्षाही अधिक काळापासून रोनाल्डो सर्वाधिक कमाई करण्याऱ्या खेळाडूंपैकी एक मानला जातो. ५ वेळा बॅलेन डी ओर विजेता आणि २०१६चा युरो कप विजेता हा पोर्तुगालचा खेळाडू १ अरब डॉलर कमावणारा पहिला खेळाडू ठरला होता.
बुगाटी ला वोइतूर नोइरे-
जगातला सगळ्यात लोकप्रिय फुटबॉलर जगातल्या सगळ्यात महागड्या गाडीचा मालक आहे. त्याच्याजवळ पाल स्पोर्ट्स गाड्या बनवणारी कंपनी बुगाटीची ‘ ला वोइतूर नोइरे’ गाडी आहे. या गाडीची किंमत ८.५ मिलियन युरो (७५ करोड) आहे. ही गाडी ताशी ३८० कमी धावू शकते. तसेच त्याच्याजवळ बुगाटी वेरॉन देखील असून तिची किंमत १.७ मिलियन डॉलर आहे. रोनाल्डो लॅंबोरगिनी इव्हेंटडोर, बेंटले जीटी स्पीड, इस्टन मार्टिन डीबी९, ऑडी आर८, रोल्स रॉयस फेंटम आणि फेरारी ५९९ सारख्या अनेक शानदार गाड्यांचा मालक आहे.
https://www.instagram.com/p/BQ2ob1fFzOY/?utm_source=ig_web_copy_link
हिरेजडित घड्याळ-
रोनाल्डोकडे उंची घड्याळ देखील असून २०१८मध्ये ओल्ड ट्रॅफडमध्ये पत्रकार परिषदेत रोनाल्डोला फ्रॅंक मूलरच्या हिरेजडित घड्याळासोबत दिसला होती. त्याची किंमत जवळपास १.२ मिलियन डॉलर होती. या खेळाडूजवळ अजून बरीच महागडी घड्याळं आहेत, ज्यामध्ये रोलेक्स, रिचर्ड मिल, हुब्लॉट, जॅकेब अँड कंपनी, बुलगारी आणि पाटेक फिलिपसारख्या लॅक्सरी घड्याळांचा समावेश आहे.
CR7 फ़ॅशन आणि लाइफस्टाईल ब्रँड-
नायकी सोबत रोनाल्डोचा आजीवन करार आहे आणि तसेच या खेळाडूचा स्वतःचा ब्रँड-सीआर 7 आहे. एका रिपोर्टनुसार CR7 च्या ब्रँडची किंमत 100 मिलियन युरोपेक्षा अधिक आहे. रोनाल्डोचा ब्रँड CR7 मध्ये डेनिम, अंडरवेअर आणि लाईफस्टाईलशी संबंधित उत्पादनांची विक्री करतो.
महत्वाच्या बातम्या-
बापरे बाप! भारतीय क्रिकेटपटूंकडे आहेत कोट्यवधींच्या गाड्या; ‘या’ खेळाडूकडे आहे ‘लँबोर्घिनी’
WTC Final: कोहली अन् शास्त्रींची प्लेइंग इलेव्हनची निवड फसली? साउथम्पटनची खेळपट्टी करतेय इशारा
नादच खुळा! अश्विन- जडेजाची जोडी बनेल भारतीय संघासाठी ब्रह्मास्त्र, ३५ कसोटीत घेतल्यात ३६२ विकेट्स