फुटबॉल
महाराष्ट्रातील या ५ खेळाडूंनी गाजवले २०१७चे खेळविश्व
२०१७ वर्ष जवळ जवळ संपले आहे. हे वर्ष भारतीय खेळाडूंनी चांगलेच गाजवले. यात अनेक महाराष्ट्रीयन खेळाडूंचा मोलाचा वाटा होता. फक्त क्रिकेटचं नाही तर कुस्ती, ...
ISL: फॉर्म हरपलेल्या केरला ब्लास्टर्सची घरच्या मैदानावर बेंगळुरुशी लढत !
कोची | हिरो इंडियन सुपर लिगमधील (आयएसएल) दक्षिण डर्बीत रविवारी केरळा ब्लास्टर्स आणि बेंगळुरू एफसी यांच्यात मुकाबला होत आहे. यंदा लिगमध्ये बेंगळुरूमुळे दक्षिणेतील तिसऱ्या संघाची ...
ISL: पुण्याकडून घरच्या मैदानावर नॉर्थईस्ट युनायटेडचा धुव्वा !
पुणे: एफसी पुणे सिटीने हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) घरच्या मैदानावरही अखेर धडाकेबाज खेळ केला. शनिवारी पुण्याने नॉर्थईस्ट युनायटेड एफसीचा तब्बल पाच गोलांनी धुव्वा ...
घरच्या मैदानावर पुण्याला नॉर्थईस्टविरुद्ध विजयाची आशा
पुणे । हिरो इंडियन सुपर लिगमध्ये शनिवारी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात एफसी पुणे सिटीची नॉर्थईस्ट युनायटेड एफसीविरुद्ध लढत होत आहे. घरच्या मैदानावर पुण्याला ...
२०१७मध्ये पुण्यात झाल्या या ५ मोठ्या क्रीडास्पर्धा !
२०१७हे वर्ष अनेक अर्थांनी देशाची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरासाठी खास ठरले. परंतु मोठ्या प्रमाणावर क्रीडा स्पर्धांचे आयोजन केल्यामुळे ही हे शहर देशाची क्रीडा ...
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने जिल्हास्तरीय क्रीडास्पर्धांचे आयोजन
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाकडून दि. २९ व ३० डिसेंबर २०१७ रोजी श्री शिवछत्रपती आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी येथे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले ...
Premier League: मॅन्चेस्टर सिटीची प्रिमियर लीगमधील स्वप्नवत सफर
प्रिमियर लीग मध्ये आज प्रत्येक संघाला धाक बसलाय तो मॅन्चेस्टर सिटीचा असे आपण कालच्या सामन्यानंतर नक्कीच बोलू शकतो. लीगचे प्रत्येक संघाचे १९ सामने झालेत आणि लीग बरोबर अर्धी संपली असतानाच विजेता संघ जवळजवळ स्पष्ट झाला आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. १९ सामन्यात १८ सामने जिंकत ५५ गुणांसह पेप गार्डिओलाची मॅन्चेस्टर सिटी पहिल्या स्थानावर आहे आणि दुसऱ्या स्थानावरील मॅन्चेस्टर युनाएटेडपेक्षा थोडेथोडके नाही तर तब्बल १३ गुणांच्या फरकाने घेतलेली ही आघाडी सिटीला नक्कीच या वर्षीच्या प्रिमियर लीगवर आपले नाव कोरण्यास मदत करेल. काल झालेल्या सामन्यात आपल्या घरच्या मैदानावर बाॅर्नेमाॅथचा ४-० ने पराभव करत सिटीने सलग १७ वा विजय नोंदवला. मागील ८ महिन्यात सिटीने एक पण प्रिमियर लीगचा सामना गमावला नाही. काल सिटी तर्फे ॲगुवारोने २ तर डॅनिलो आणिस्टर्लिंगने प्रत्येकी १-१ गोल नोंदवला. ॲगुवारो आणि स्टर्लिंगने प्रत्येकी १-२ गोलला असिस्ट सुद्धा केले. पहिल्या हाफ मध्ये २७ व्या मिनिटला बाॅर्नेमाॅथच्या गोलकिपरच्या चुकीमुळे सिटीने बाॅलवर ताबा मिळवला आणि फर्नडिन्होच्यापासवर ॲगुवारोने हेडर मारत सिटी साठी पहिला गोल केला. हा ॲगुवारोचा सिटीच्या घरच्या मैदानावर १०० वा गोल होता. सिटीसाठी ७९ व्या मिनिटला तिसरा आणि ॲगुवारोचा दूसरा गोल पण हेडरच होता. प्रिमियर लीगच्या एकाच सामन्यात हेडरने दोनगोल करायची ॲगुवारोची ही पहिलीच वेळ होती. या मौसमातील ११ मधुन ७ गोल्स शेवटच्या १० मिनिटात करणार्या स्टर्लिंगने सामन्याच्या ५३ व्या मिनिटला ॲगुवारोच्यापासला उजव्या कोपर्यातुन मारत सिटीचा दूसरा आणि आपला १२ वा गोल केला. शेवटच्या मिनिटात गोल साठी प्रसिद्ध झालेल्या स्टर्लिंगने बाॅल आपल्या ताब्यात घेत बदली खेळाडू म्हणुन आलेल्या डिफेंडर डॅनिलोकडे दिला आणि त्याने त्याचे गोल मध्ये रुपांतर करत सिटी साठी आपला पहिला गोल नोंदवला तर स्टर्लिंगने आपल्या नावे एक असिस्ट नोंदवला. # सिटीने २०१७ वर्षात १००+ गोल्स करत १९८२ च्या लीवरपुलच्या १०६ गोल्स नंतर असा पराक्रम करणारा पहिला संघ ठरला. # या मौसमात युरोपच्या टाॅप ५ लीग मध्ये अपराजित राहणार्या २ संघांमधून मॅन्चेस्टर सिटी हा १ संघ आहे. # युरोपच्या टाॅप ५ लीगमध्ये सर्वाधिक सामने लागोपाठ जिंकायच्या यादीत सिटी १७ विजयासह दूसर्या स्थानावर आहे तर२०१३-१४ च्या १९ विजयासह बायर्न म्युनिच पहिल्या स्थानी आहे. विशेष म्हणजे तेव्हा पण बायर्नचा मॅनेजर पेप गार्डिओलाच होता. # आपल्या घरच्या मैदानावर या वर्षी सिटीने एक पण सामना गमावला नाही. झालेल्या २६ सामन्यात २१ विजय तर ५ सामने बरोबरीत सुटले.
La Liga: सॅंटियागो बर्नब्यूवर पुन्हा एकदा मेस्सीच्या बार्सिलोनाचा बोलबाला
लिओनेल मेस्सीच्या एफसी बार्सिलोनाने सॅंटियागो बर्नब्यूवर पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करत रियल मॅड्रिडचा ०-३ ने पराभव केला. बार्सिलोनातर्फे सुवारेज, मेस्सी आणि बदली खेळाडू ...
ISL: दिल्लीला हरवून एटीकेचा सलग दुसरा विजय
कोलकाता: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) दोन वेळा विजेतेपद मिळविलेल्या एटीकेने चौथ्या मोसमात फॉर्म गवसताच टॉप गिअर टाकण्यास सुरवात केली आहे. मार्की खेळाडू रॉबी किन ...
ISL: गोव्यात दोन गोलसह पुणे सिटीचा विजय साजरा
फातोर्डा (गोवा): हिरो इंडियन सुपर लिगच्या (आयएसएल) चौथ्या मोसमात धडाकेबाज फॉर्म गवसलेल्या एफसी गोवा संघाला शनिवारी रंगतदार लढतीत एफसी पुणे सिटीने 2-0 असे हरविले. दुसऱ्या ...
ISL: नॉर्थईस्ट युनायटेड विरुद्ध बलवंत ठरला मुंबईचा हिरो
गुवाहाटी: मुंबई सिटी एफसीने हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) बाहेरील मैदानावरील सामन्यात (अवे मॅच) चौथ्या मोसमात पहिलावहिला विजय मिळविला. नॉर्थईस्ट युनायटेड एफसीविरुद्ध बलवंत सिंगच्या दोन ...
ISL 2017: नॉर्थईस्टसमोर आज मुंबई सिटीच आव्हान
गुवाहाटी | हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) बुधवारी नॉर्थईस्ट युनायटेड एफसीची मुंबई सिटी एफसीविरुद्ध लढत होत आहे. नॉर्थईस्टला पहिल्या पाच समन्यांत केवळ चार गुण ...