इंदोर शहरात एकाच वर्षी दोन वेळा रणजी ट्राॅफी स्पर्धेची फायनल झाली होती. आजपर्यंत रणजी ट्राॅफी स्पर्धेच्या ८६ स्पर्धा झाल्या आहेत परंतु २०१७मध्ये पहिल्यांदाच एकाच वर्षात दोन वेळा रणजी ट्राॅफीची फायनल झाली होती.
२०१६-१७च्या मोसमातील ८३व्या रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना १० ते १४ जानेवारी २०१७ रोजी होळकर स्टेडियम इंदोर येथे झाला होता. हा सामना गुजरात संघाने मुंबईविरुद्ध ५ विकेट्सने जिंकला होता.
त्यानंतर २०१७-१८च्या मोसमातील ८४व्या रणजी स्पर्धेत विदर्भ विरुद्ध दिल्ली असा सामना झाला होता. या सामनाही याच स्टेडियमवर झाला होता. हा सामना २९ डिसेंबर २०१७ ते १ जानेवारी २०१८ दरम्यान झाला होता.
रणजी मोसमातील सर्वात लवकर अंतिम फेरीचा सामना सुरु होण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यापूर्वी कायम स्पर्धेचा अंतिम सामना नवीन वर्षात होत असे. परंतु ८४व्या रणजी ट्रॉफी मोसमात प्रथमच संपूर्ण स्पर्धा एकाच वर्षांत झाली होती.
मोसमात सर्वात कमी दिवसात स्पर्धेचा अंतिम सामना होण्याचा विक्रमही २०१७-१८ मोसमात झाला होता.
ट्रेंडिंग घडामोडी-
आम्हाला भारताला भारतात कसोटीत करायचे आहे पराभूत
ड्रीम ११: लग्न न झालेल्या क्रिकेटपटूंची टीम इंडिया
ड्रीम ११: फक्त कन्यारत्नं असलेल्या भारतीय क्रिकेटपटूंची ड्रीम टीम…