---Advertisement---

विश्वचषकाची फायनल खेळण्याआधी भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली…

On: रविवार, मार्च 8, 2020 11:00 AM
---Advertisement---

आज (8 मार्च) मेलबर्न येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात (India Women’s Vs Australia Women’s) आयसीसी महिला टी20 विश्वचषकाचा (ICC Womens T20 World Cup) अंतिम सामना होणार आहे. या सामन्यापुर्वी भारतीय संघाला 8 दिवसांचा ब्रेक मिळाल्याने त्यांच्या तयारीवर चांगला परिणाम झाला आहे.

यावेळी, भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने (Harmanpreet Kaur) म्हटले आहे की, “भारतीय संघ मेलबर्न स्टेडियममध्ये हजारो प्रेक्षकांच्यासमोर दमदार प्रदर्शन करण्यास उत्सुक आहे.”

29 फेब्रुवारीला भारताने श्रीलंकाविरुद्ध शेवटचा विश्चचषकाचा सामना खेळला होता. यानंतर गुरुवारी (5 मार्च) त्यांचा इंग्लंडविरुद्ध उपांत्य सामना होता. मात्र, पावसाच्या व्यत्ययामुळे इंग्लंडविरुद्धचा उपांत्य सामना रद्द झाला आणि भारत अ गटात अव्वल क्रमांकावर असल्याने प्रथमच टी20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला.

हरमनप्रीतने काल सांगितले की, “आम्ही परदेशात खूप कमी सराव केला आहे आणि आम्हाला इंग्लंडविरुद्धचा महत्त्वपूर्ण उपांत्य सामनाही खेळता आला नाही. त्यामुळे आम्हाला इनडोअर सराव करावा लागला. यामुळे आपला पूर्ण आत्मविश्वास वाढत नाही, कारण येथील खेळपट्टी पूर्णपणे वेगळी आहे. असे असले तरी संघातील सर्व खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे सर्वांना माहीत आहे की त्या संघासाठी काय करू शकतात.”

“आम्हाला विश्राम करण्याचीही संधी मिळाली आहे. जेव्हा आपल्याला अधिक काळ सलग खेळावे लागते तेव्हा विश्रांतीची सर्वाधिक गरज भासते. पण, संघातील कुणालाही आराम करायचा नाही. सर्वजण खेळण्यासाठी उत्सुक आहेत. प्रत्येकजण मैदानावरील येणाऱ्या परिस्थितीशी लढण्यास तयार आहेत. याचबरोबर अंतिम सामन्याचे 75 हजार तिकिट विकले गेले आहेत. त्यामुळे संघ या मोठ्या संधीचा आनंद घेईल आणि सकारात्मक क्रिकेट खेळेल,” असेही हरमनप्रीत पुढे म्हणाली.

2017 साली लॉर्ड्समध्ये इंग्लंडविरुद्ध वनडे विश्वचषकाचा अंतिम सामना खेळणारी हरमनप्रीत पुढे म्हणाली, “हा शानदार अनुभव असेल. पहिल्यांदाच आम्ही 90 हजार प्रेक्षकांसमोर खेळणार आहोत आणि आम्ही हा सामना सकारात्मकतेने खेळू. भारताने टी20 विश्वचषकाच्या सुरुवातीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 17 धावांनी पराभूत केले होते. त्यामुळे दोन्ही संघासाठी ही नवीन सुरुवात असेल.”

“यावेळी आम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की, रविवार हा आमच्यासाठी एक नवा दिवस असेल आणि आम्हाला नव्याने याची सुरुवात करावी लागेल. लीग सामन्यात आम्ही खूप चांगले खेळलो आहोत. दोन्ही संघ दबावाखाली आहेत आणि दोन्ही संघ विजेतेपद जिंकण्यास सक्षम आहेत.” असेही हरमनप्रीत म्हणाली.

महत्त्वाच्या बातम्या – 

–१६ व्या वर्षी विश्वचषक गाजवणारी कोण आहे शेफाली वर्मा?

–महिला टी२० विश्वचषकातील भारताचे टॉप ३ गोलंदाज

–महिला टी२० विश्वचषकातील या आहेत भारताच्या टॉप ३ फलंदाज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---