माजी भारतीय धावपटू पीटी उषाने १९८४चे आॅलिंम्पिक पदक निकृष्ठ दर्जाच्या अन्नामुळे हुकल्याचे वक्तव्य केले आहे. लॉस एंजेल्समधील आॅलिम्पिक स्पर्धेत उषाचे हे कांस्यपदक थोडक्यात हुकले होते.
“स्पर्धेत अमेरिकन न्याहारी ही माझ्यासाठी नित्याची नव्हती यामुळे मला भाताची खिचडी आणि लोणचेच खाण्यास दिले जायचे”, असे उषा म्हणाली.
“याचा माझ्या अंतिम फेरीच्या कामगिरीवर परिणाम झाला. शेवटच्या ३५ मीटरमध्ये माझ्या शरीरातील उर्जा कमी झाली होती.”
“आम्हाला आधी कोणीच सांगितले नाही की तेथे भारतीय जेवण मिळणार नाही. यामुळे भाताची खिचडी खाण्यशिवाय माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता.”
४०० मीटरच्या त्या ऐतिहासिक शर्यतीत उषा आणि रोमानियाची क्रिस्टियाना कोजोकारू यांनी एकाच वेळेत ही शर्यत पूर्ण केली होती. पण नंतर क्रिस्टियानाने ते कांस्यपदक मिळवले. तसेच मोरक्कोच्या नॅवल मौटावकालने सुवर्ण तर स्वीडनच्या अॅन लुइसने रौप्यपदक जिंकले होते.
उषाने जवळपास १८ वर्षे भारताला विविध स्पर्धेत पदक जिंकून दिले आहे. आता तीने अॅथलेटिक्ससाठी एक अकादमी काढली आहे.
“मला आॅलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकण्याचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. यासाठीच मी स्कूल ऑफ अॅथलेटिक्स सुरू केले आहे. सध्या येथे १८ मुली सराव करत आहेत”, असेही उषा पुढे म्हणाली.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–एशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार
–अटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते