आयपीएलमध्ये विदेशी खेळाडू अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात. अनेक स्टार विदेशी खेळाडू त्यांच्या धमाकेदार कामगिरीनं चाहत्यांच्या गळ्यातले ताईत बनलेले आहेत. मात्र आता आयपीएल 2024 बाबत जी बातमी समोर आली आहे, ती क्रिकेट चाहत्यांसाठी दुख:दायक आहे.
वास्तविक, एप्रिल आणि मे महिन्यांमध्ये 5 टी 20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळल्या जाणार आहेत. ज्यामुळे अनेक विदेशी खेळाडू आयपीएलच्या मध्यातच आपल्या संघाची साथ सोडून मायदेशी परतू शकतात. मे महिन्याच्या सुरुवातीला बांग्लादेश आणि झिम्बाब्वे यांच्यात 5 सामन्यांची टी 20 मालिका खेळली जाणार आहे. जर या मालिकेत दोन्ही संघ पूर्ण ताकदीनं उतरले तर बांग्लादेशचा मुस्तफिजूर रहमान आणि झिम्बाब्वेच्या सिकंदर रजाला आयपीएल 2024 अर्ध्यातच सोडून मायदेशी परतावं लागेल. मुस्तफिजूर रहमान आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि सिकंदर रजा पंजाब किंग्जकडून खेळतो.
याशिवाय, एप्रिल महिन्यात न्यूझीलंडच्या संघाला पाकिस्तानचा दौरा करायचा आहे. मात्र किवींनी पाकिस्तानात आपला दुय्यम संघ पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. बांग्लादेशला झिम्बाब्वेच्या मालिकेनंतर अमेरिकेविरुद्ध 3 सामन्यांची टी20 मालिका खेळायची आहे. ज्यामुळे मुस्तफिजूर रहमान आयपीएलच्या प्लेऑफ सामन्यांसाठी देखील उपलब्ध राहणार नाही.
आगामी टी20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर, इंग्लंडचा संघ पाकिस्तानविरुद्ध 4 सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. ही मालिका 22 मे ला सुरू होऊन 20 मे पर्यंत चालेल. याचाच अर्थ, इंग्लंडचे अनेक बडे खेळाडू आयपीएल 2024 च्या प्लेऑफ सामन्यांसाठी उपलब्ध राहणार नाही. आयपीएलमध्ये इंग्लंडचे अनेक खेळाडू खेळत आहेत. त्यामुळे संघांना त्यांच्या अनुपलब्धतेचा मोठा फटका बसू शकतो.
आयपीएल दरम्यान खेळल्या जाणाऱ्या टी 20 मालिका
पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड – 5 टी 20 – 18 एप्रिल ते 27 एप्रिल
बांग्लादेश विरुद्ध झिम्बाब्वे – 5 टी 20 – 3 मे ते 12 मे
आयर्लंड विरुद्ध पाकिस्तान – 3 टी 20 – 10 मे ते 14 मे
अमेरिका विरुद्ध बांग्लादेश – 3 टी 20 – 20 मे ते 24 मे
इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान – 4 टी 20 – 22 मे ते 30 मे
महत्त्वाच्या बातम्या-
हार्दिक पांड्याला टी20 विश्वचषकात जागा मिळणार नाही? माजी मुख्य निवडकर्त्यानं केलं मोठं विधान
पांड्या बंधूंनी गायलं ‘हरे रामा-हरे कृष्णा’, भजनाच्या तालावर बेधुंद नाचले!