आयपीएलच्या चालू हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची अवस्था अत्यंत वाईट आहे. आरसीबी गुणतालिकेत 9व्या स्थानी आहे. त्यांचा पुढील सामना गुरुवारी (11 एप्रिल) मुंबई इंडियन्सविरुद्ध आहे.
या पार्श्वभूमीवर दिग्गज खेळाडू ब्रायन लारानं आरसीबीची सध्याची कामगिरी आणि मुंबई इंडियन्सविरुद्ध संघाच्या विजयाच्या शक्यतांवर भाष्य केलंय. लारानं काही महत्त्वाचे मुद्दे मांडत सांगितलं की, आरसीबी अजूनही परफेक्ट टीम कॅम्बिनेशन बनवण्यासाठी संघर्ष करत आहे. लारा यांच्या मते आरसीबीनं यासाठी लोकल खेळाडूंवर अधिक लक्ष्य दिलं पाहिजे.
ब्रायन लारा म्हणाले, “मुंबई इंडियन्ससाठी आरसीबीचा सामना करण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे. टीममध्ये सूर्यकुमार यादवचं पुनरागमन झालंय. जरी तो पहिल्या सामन्यात काही कमाल करू शकला नाही, मात्र तो परतल्यानं मुंबईचा मध्यक्रम बळकट झाला आहे. आरसीबी अजूनही परफेक्ट टीम कॉम्बिनेशनच्या शोधात आहे. महिपाल लोमरोर बद्दल बोलायचं झालं तर त्यानं इम्पॅक्ट प्लेअर म्हणून चांगली कामगिरी केली आहे. माझ्या मते आरसीबीनं लोकल खेळाडूंकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. त्यांच्याकडे विराट कोहली आहे, मात्र जोपर्यंत लोकल खेळाडू चांगली कामगिरी करत नाही, तोपर्यंत तुम्ही आयपीएल ट्रॉफी जिंकू शकत नाही. माझी या युवा खेळाडूंना दबावात खेळताना पाहण्याची इच्छा आहे.”
आयपीएल 2024 च्या पहिल्या सामन्यात आरसीबीला चेन्नईकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. पुढच्या सामन्यात त्यांनी पंजाब किंग्जवर विजय मिळवला. मात्र त्यानंतर आरसीबीचा सलग तीन सामन्यांमध्ये पराभव झालाय. टीम सध्या गुणतालिकेत केवळ 2 गुणांसह 9व्या स्थानी आहे.
आरसीबीसाठी विराट कोहली सातत्यानं चांगली कामगिरी करत आहे. त्यानं 5 सामन्यांमध्ये 105 च्या सरासरीनं 316 धावा ठोकल्या आहेत. मात्र संघ त्याच्या फलंदाजीवरच अवलंबून दिसतोय. ग्लेन मॅक्सवेल, फाफ डू प्लेसिस आणि कॅमरुन ग्रीन सारखे मोठे विदेशी खेळाडू आतापर्यंत सपशेल अपयशी ठरले आहेत. शिवाय आरसीबीच्या गोलंदाजीतही धार दिसलेली नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
हार्दिक पांड्याला टी20 विश्वचषकात जागा मिळणार नाही? माजी मुख्य निवडकर्त्यानं केलं मोठं विधान
पांड्या बंधूंनी गायलं ‘हरे रामा-हरे कृष्णा’, भजनाच्या तालावर बेधुंद नाचले!
‘सर’ जडेजानं केली ‘थाला’ची बरोबरी, एमएस धोनीचा आयपीएलमधील मोठा रेकॉर्ड धोक्यात