भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह मागच्या मोठ्या काळापासून संघातून बाहेर आहे. दुखापतीमुळे बुमराहने मागच्या वर्षी पार पडलेल्या आशिया चषक आणि टी-20 विश्वचकातूनही माघार घेतली. ताज्या माहितीनुसार बुमराहा अद्याप दुखापतीतून सावरला नाहीये आणि त्याला शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे. अशात भारताचे माजी क्रिकेटपटू मदन लाल यांनी बुमराहाच्या फिटनेसविषयी मोठी प्रतिक्रिया दिली. मदन लाल यांच्या मते संघाता आता बुमराहाचा जास्त विचार करणे योग्य नाही.
एका वृत्तवाहिनीवर मदन लाल (Madan Lal) बोलत होतो. यावेळी त्यांनी म्हटल्याप्रमाणे जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याला दुखापतीतून सावरण्यासाठी अजून बराच वेळ लागू शकतो. अशात संघाने त्याची वाट पाहणे थांबवले पाहिजे. मदन लाल म्हणाले, “जागतिक कसोटी अजिंक्यत स्पर्धेत भारताला 3 वेगवान गोलंदाजांची गरज पडणार आहे. उमेश यादवला अंतिम सामन्यासाठी नेले पाहिजे. संघाला एका फिरकी गोलंदाजाचीही गरज पडू शकते. बुमराहला तुम्ही सर्वाजण आता विसरा. तो जेव्हा पुनरागमन करेल, तेव्हा पाहिजे जाईल. तो तेव्हा परत खेळेल, याची खात्री देता येणार नाही. त्याची दुखापत गंभीर आहे. त्याला अजून खूप वेळ लागू शकतो.”
“कोणत्याही खेळाडूला दुखापतीतून सावरण्यासाठी तीन महिन्यांचा काळ लागतो. बुमराह मागच्या 6 महिन्यांपासून खेळत नाहीये. हार्दिक पंड्या चार महिन्यांमध्ये संघात परतला होता. पण आपण आता आशा ठेवणे थांबवले पाहिजे. त्याला अजून खूप काळ लागणार आहे. पहिला बुमराह पुन्हा पाहायला असेल, तर अजून थोडी वाट तरी पाहावीच लागेल,” असे मदन लाल पुढे म्हणाले.
शस्त्रक्रियेसाठी बुमहारचा न्यूझीलंड दौरा
जसप्रीत बुमराह मागच्या काही महिन्यापासून बेंगलोरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत रिहॅबिलिटेशन करत आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार काही दिवासंपूर्वीपासून सांगितले जात आहे की, बुमराह शस्त्रक्रियेसाठी न्यूझीलंड दौरा करू शकतो. शनिवारी (4 मार्च) अशी माहितीही समोर आली की, बुमराह या शास्त्रक्रियेसाठी न्यूझीलंडमध्ये दाखल झाला आहे. पण अद्याव याविषयी कुठलीची अधिकृत माहिती समोर आली नाहीये.
(‘Forget Jasprit Bumrah now’, a big statement from the former Indian legend)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘हा संघ पॅट कमिन्सचा आहे…’, तिसरा सामना जिंकल्यानंतर स्मिथचे वक्तव्य चर्चेत
डब्ल्यूपीएल पहिली लढत मुंबई आणि गुजरात संघात, जाणून घ्या केव्हा आणि कधी पाहता येणार सामना