---Advertisement---

अभिषेक, ईशान किंवा सूर्या नाही, ‘हे’ 2 खेळाडू भारताला वर्ल्ड कप जिंकवून देणार! रोहित शर्माचं मोठं वक्तव्य

On: बुधवार, जानेवारी 28, 2026 9:00 PM
---Advertisement---

टी-20 विश्वविजेता कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) मते, आगामी 2026 च्या वर्ल्ड कपमध्ये अष्टपैलू हार्दिक पांड्या (Hardik pandya) आणि डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग (Arshdeep singh) हे भारताच्या यशासाठी अत्यंत महत्त्वाचे खेळाडू असतील. 7 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या या स्पर्धेत टीम इंडिया प्रबळ दावेदार म्हणून मैदानात उतरेल.

रोहित शर्माने ‘जिओ हॉटस्टार’शी बोलताना अर्शदीपचे कौतुक केले. जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप जोडीने खेळणे भारतासाठी सकारात्मक आहे. अर्शदीप नवीन चेंडू स्विंग करण्यात माहिर आहे. तो उजव्या हाताच्या फलंदाजांना एलबीडब्ल्यू (पॅडवर मारणे) करू शकतो आणि डाव्या हाताच्या फलंदाजांना स्लिपमध्ये बाद करण्याची क्षमता ठेवतो.

2024 च्या फायनलमध्ये अर्शदीपने 19 व्या षटकांमध्ये केवळ 2-3 धावा देऊन दक्षिण आफ्रिकेवर दडपण आणले होते, याची आठवण रोहितने करून दिली.

हार्दिक फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये सातत्य ठेवतो. जर भारताने 160 धावा केल्या असतील, तर हार्दिक धावसंख्या 220 पर्यंत नेऊ शकतो. तसेच, 50 धावांत 4 विकेट पडल्या तरी तो डाव सावरू शकतो.

रोहितने एका तांत्रिक बाबीवरही बोट ठेवले. तो म्हणाला की, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती या दोघांना एकाच वेळी प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवणे कर्णधार सूर्यकुमार यादव आणि कोच गौतम गंभीर यांच्यासाठी मोठे आव्हान असेल. जर टीम इंडिया केवळ दोनच वेगवान गोलंदाजांसह उतरली, तरच हे शक्य आहे. रोहितच्या मते, हे दोन्ही फिरकीपटू विकेट घेणारे असल्याने त्याने दोघांनाही संघात स्थान दिले असते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---