भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) दोन्ही संघात सुरू असलेल्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना 23 जुलै ते 27 जुलै दरम्यान मँचेस्टरमध्ये खेळवला जात आहे. या सामन्यावर सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत, कारण जर इथे भारतीय संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं, तर ट्रॉफी त्यांच्या हातातून निसटेल.
या मुद्द्यावर भारताचे माजी सलामीवीर आकाश चोप्रा (Aaksh Chopra) यांनीही आपले मत मांडले आहे. आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना ते म्हणाले, बुमराहने हा मँचेस्टरचा सामना तर नक्कीच खेळायला हवा. त्यानंतर ठरवा की पुढचा खेळायचा की नाही. पण मॅचेस्टर मधील सामन्यात देखील जसप्रीत बुमराहकडून लाजिरवाणी कामगिरी झालेली आहे. आता टीम इंडियाला या सामन्यात चमत्कारच वाचवू शकतो.
जर गरज वाटली, तर त्याने सगळे म्हणजे चारही सामने खेळायला हवेत. कारण यानंतर दीड महिन्याचा ब्रेक आहे. आशिया कप स्पर्धेला सुरुवात व्हायला वेळ आहे. संपूर्ण ऑगस्ट महिना मोकळा आहे, सप्टेंबरमध्ये या परत. नाही खेळावं वाटत आशिया कप, तर नका खेळू. एन्जॉय करा. पण ही कसोटी मालिका जिंकूनच द्या. मला वाटतं हेच योग्य आहे.






