इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ऍशेस मालिका 2023चा दुसरा कसोटी सामना बुधवारपासून (दि. 28 जून) खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग याने इंग्लंडच्या गोलंदाजी आक्रमणाचा सामना करण्यासाठी दोन फलंदाजांना मोलाचा सल्ला दिला आहे. ऑस्ट्रेलियाने एजबॅस्टन मैदानातील पहिल्या कसोटीत दोन विकेट्सने विजय मिळवला. हा आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023-25 सायकलचा पहिला सामना होता.
रिकी पाँटिंग (Ricky Ponting) याने ऑस्ट्रेलियाचे विस्फोटक फलंदाज मार्नस लॅब्यूशेन (Marnus Labuschagne) आणि ट्रेविस हेड (Travis Head) यांना सल्ला दिला आहे. हे दोन्ही खेळाडू ऍशेस मालिका 2023मधील (Ashesh Series 2023) पहिल्या कसोटीत संघर्ष करताना दिसले होते. पाँटिंगच्या मते, यश मिळवण्यासाठी लॅब्यूशेन याने बेसिक्सवर लक्ष दिले पाहिजे.
आयसीसीशी बोलताना पाँटिंग म्हणाला की, “त्याने मला येऊन विचारण्याची मी वाट पाहील., ही माझा जागा नाहीये. मी त्याच्या प्रशिक्षकाच्या यादीत सामील नाहीये. मी फक्त एक माजी खेळाडू आहे आणि आकलन करत आहे की, तो काय करत आहे. मात्र, मला लॅब्यूशेनसोबत त्याच्या फलंदाजीविषयी चर्चा करायला आवडेल. कारण, मागील काही आठवड्यांमध्ये मी जे पाहिले, त्यावरून मला समजले की, तो गोष्टी कठीण करत आहे.”
पाँटिंगने म्हटले की, “मला माहिती आहे की, त्याला त्या गोष्टीवर विश्वास ठेवण्याची गरज आहे, ज्याने मागील काही वर्षांमध्ये त्याला कसोटी क्रिकेटमध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज बनवले आहे. मी त्याला म्हणेल की, त्यावेळचे काही व्हिडिओ पाहावे, जेव्हा तो आपले सर्वोत्तम प्रदर्शन करत होता आणि त्या गोष्टी आठवाव्या आणि पुन्हा तसेच करावे.”
पाँटिंगचे असेही मत आहे की, हेडला सुरुवातीला इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांच्या उसळी चेंडूंचा सामना करावा लागेल. तो म्हणाला की, सर्वात आधी त्याने समजले पाहिजे की, असे होईल, त्याला असे होण्याची आशा करावी लागेल.
पाँटिंग म्हणाला की, “मला वाटते की, त्याला याविषयी आपल्या विचारावर काम करावे लागेल. अशाप्रकारच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी त्याच्याकडे सर्वोत्तम पद्धत काय आहे, गोलंदाजांना निशाणा बनवायचे आहे का? शरीराच्या दिशेने येणाऱ्या चेंडूविरुद्ध हुक आणि पुल शॉट खेळायचा आहे का? तो चेंडू सोडण्याची पद्धत शोधू शकतो का? तो चांगल्याप्रकारे चेंडू सोडू शकतो, ज्यामुळे गोलंदाजाला थकवण्याचा प्रयत्न केला जाईल.”
इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया (England vs Australia) संघातील दुसरा कसोटी सामना लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर खेळला जाणार आहे. पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने 2 विकेट्सने विजय मिळवला होता. (former captain ricky ponting offer batting advice to marnus labuschagne and travis head ahead of lords test)
महत्वाच्या बातम्या-
गावसकरांचे विधान वाढवेल ‘माही’च्या चाहत्यांचं टेन्शन! म्हणाले, धोनी नाही ‘हा’ आहे खरा Captain Cool
‘रिंकू बाप आहे…’, चाहत्याच्या प्रश्नाचे उत्तर देताना KKRचा मालक शाहरुखचे स्टार खेळाडूबाबत मोठे विधान