इंदोर येथे 1 मार्चपासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील तिसऱ्या कसोटीला सुरुवात होणार आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2023 मध्ये पाहुण्या संघाला नमवत भारताने 2-0 ने मालिकेत आघाडी घेतली आहे. आता मालिकेतील या उर्वरित दोन सामन्यात ऑस्ट्रेलिया संघ पुनरागमन करण्यासाठी प्रयत्न करेल. मात्र, त्याचवेळी ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार मार्क टेलर यांनी भारतीय खेळपट्ट्यांविषयी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
ऑस्ट्रेलियन संघ 17 वर्षांच्या कालावधीनंतर भारतात मालिका विजय मिळवण्याच्या निर्धाराने या मालिकेत सहभागी झाला होता. ऑस्ट्रेलिया तसेच इतर देशांच्या माजी क्रिकेटपटूंनी ऑस्ट्रेलियालाच या मालिकेत विजयाची संधी असल्याचे म्हटले होते. मात्र, प्रत्यक्ष मालिकेत ऑस्ट्रेलियन संघ भारतापेक्षा दुबळा दिसला. भारतीय गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियाच्या सर्वच फलंदाजांनी अक्षरशः गुडघे टेकले. नागपूर व दिल्ली येथे झालेल्या पहिल्या दोन्ही कसोटी भारतीय संघाने तीन दिवसात जिंकत बॉर्डर-गावसकर ट्रॉफी सलग चौथ्यांदा आपल्याकडे राखण्यात यश मिळवले.
भारतीय खेळपट्ट्यांवर फिरकी गोलंदाजांना मदत मिळते. हाच मुद्दा उचलून धरत ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार मार्क टेलर म्हणाले,
“भारतात अशा खेळपट्ट्या बनवल्या जातात ज्या त्यांच्या खेळासाठी पोषक आहेत. आपले खेळाडू आयपीएलमध्ये खेळतात मात्र त्यावेळी खेळपट्ट्या वेगळ्या असतात. संघ सकारात्मक दृष्टिकोन ठेवून भारतात आला होता. मात्र, त्यासाठी तुमच्याकडे तंत्र असणे देखील तितकेच गरजेचे असते. ऑस्ट्रेलियन संघाने दुसऱ्या कसोटीत हाराकिरी दाखवली.”
तिसरा सामना इंदोर येथे खेळला जाईल. ऑस्ट्रेलियाला आपली इभ्रत राखण्यासाठी कमीत कमी एक सामना जिंकणे गरजेचे आहे. मालिकेतील अखेरचा सामना अहमदाबाद येथे होणार आहे. भारतीय संघाने दोन्ही सामने जिंकल्यास संघ जागतिक कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानी पोहोचेल. तसेच, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत देखील धडक मारेल.
(Former Australia Captain Mark Taylor Said India Pitches For There Favour)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयसीसी ‘टीम ऑफ द टूर्नामेंट’मध्ये फक्त एक भारतीय खेळाडू! मेग लॅनिंगच्या हातून निसटले कर्णधारपद
मितालीसह लग्नाच्या बेडीत अडकला शार्दुल! मराठमोळ्या पद्धतीने पार पडला ‘लॉर्ड’चा विवाहसोहळा