सध्या भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी (Border Gavaskar Trophy) मालिका खेळली जात आहे. त्यातील चौथा सामना मेलबर्नच्या मैदानावर खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) 3 धावा करून ‘पॅट कमिन्स’च्या (Pat Cummins) चेंडूवर बाद झाला. त्यानंतर अनेक दिग्गज खेळाडूंनी त्याने खेळलेल्या शाॅटवर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच ‘रिकी पाॅन्टिंग’ने (Ricky Ponting) देखील रोहितवर निशाणा साधत म्हटले की, मजबूत गोलंदाजीचा सामना करताना तुम्हाला तयार राहून चांगले निर्णय घेण्याची गरज आहे.
रोहितने खेळलेल्या शाॅटबद्दल बोलताना रिकी पाॅन्टिग म्हणाला, “हा फक्त एक आळशी, यादृच्छिक, स्पूर-ऑफ-द-मोमेंट शॉट आहे. पदार्पणापासूनच तो सर्वोत्कृष्ट हुकर आणि बॉल ओढणारा म्हणून ओळखला जातो, पण तसे नाही, असे काही नाही. ते वचनबद्ध नाही. तो आक्रमक दिसत नाही. तो फक्त डोके टॅप करण्याचा प्रयत्न करीत आहे.”
पुढे बोलताना पॉन्टिंग म्हणाला, “तुम्ही विकेटवर टिकून राहू शकता, होय, कदाचित थोडी सीम त्याच्यापासून दूर असेल, परंतु जर तुम्हाला या ऑस्ट्रेलियन आक्रमणासमोर टिकून राहायचे असेल, तर तुम्हाला सावध राहून चांगले निर्णय घ्यावे लागतील. तुम्ही तसे केले नाही तर ते तुम्हाला प्रत्येक वेळी मारतील.”
‘रोहित शर्मा’च्या (Rohit Sharma) आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने भारतासाठी 2013ला कसोटी पदार्पण केले होते. तेव्हापासून आतापर्यंत त्याने भारतासाठी 66 कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 114 डावात फलंदाजी करताना 41.24च्या सरासरीने 4,289 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याने 12 शतकांसह 18 अर्धशतके झळकावली आहेत. कसोटीत त्याची सर्वोच्च धावसंख्या 212 आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सलग दुसऱ्या दिवशी धावांचा पाऊस, तब्बल 20 वर्षांनंतर घडलं असं काहीतरी!
हा आहे सचिनचा दर्जा! मेलबर्न कसोटीदरम्यान ऑस्ट्रेलियात मिळाला विशेष सन्मान
मोहम्मद सिराजला ‘ड्रॉप’ करा, दिग्गज क्रिकेटपटू लाईव्ह मॅचदरम्यान संतापले!