2020-21च्या बाॅर्डर-गावसकर मालिकेत (Border Gavaskar Trophy) ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारताने शानदार विजय मिळवला होता. भारताने 2-1 ने मालिका आपल्या नावावर केली होती. ब्रिस्बेनमध्ये झालेल्या शेवटच्या सामन्यात ‘रिषभ पंत’ने (Rishabh Pant) 89 धावांची नाबाद खेळी करत भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता. या विजयात ‘चेतेश्वर पुजारा’नेही (Cheteshwar Pujara) महत्वाची भूमिका बजावली होती. पंत आक्रमक धावा करत असताना पुजाराने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांविरूद्ध वर्चस्व गाजवले होते.
त्या बाॅर्डर-गावसकर मालिकेत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन (Tim Paine) होता. तत्पूर्वी आगामी बॉर्डर-गावसकर ट्राॅफीपूर्वी टीम पेनने मोठे वक्तव्य केले आहे. तो म्हणाला, “अनेक लोक त्या शेवटच्या ऑस्ट्रेलिया मालिकेत रिषभबद्दल खूप बोलतात, पण खरी ती मालिका जिंकवणारा खेळाडू पुजारा होता. त्याने आमच्या वेगवान गोलंदाजांना थकवले. चेंडू अंगावर आदळल्यानंतरही पुजारा मागे हटला नाही. तो शेवटपर्यंत उभा रहायला.”
मात्र, यावेळी भारताकडे चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) नाहीत. न्यूझीलंडविरूद्ध मायदेशातील मालिका गमावल्यानंतर आणि मोहम्मद शमीच्या (Mohammed Shami) अनुपस्थितीत 5 सामन्यांची ऑस्ट्रेलिया मालिका भारतासाठी आव्हानात्मक ठरू शकते.
टीम पेन (Tim Paine) म्हणाला, “माझ्या मते ऑस्ट्रेलिया सुरुवातीपासूनच प्रबळ दावेदार असेल. मला वाटते की, भारताची कामगिरी काही विशेष झाली नाही. त्यांची फलंदाजी थोडी कमकुवत वाटत आहे. ऑस्ट्रेलियाची फलंदाजी फारशी चांगली दिसत नाही, पण त्यांची गुणवत्ता आम्हाला माहीत आहे. मोहम्मद शमीच्या अनुपस्थितीने मोठा फरक पडणार आहे. गेल्या वेळी तो होता, त्याने आम्हाला खूप थकवले. आता बुमराहवर खूप दडपण असेल.”
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs NZ; 24 वर्षांनंतर भारतीय संघाच्या नावावर होऊ शकतो, ‘हा’ नकोसा रेकाॅर्ड!
IND vs NZ; मुंबईच्या मैदानावर जयस्वालच्या नावावर होणार ‘हा’ धमाकेदार रेकाॅर्ड?
“त्याच्यावर शंका घेणे अयोग्य”, रोहित शर्माच्या समर्थनार्थ आला सर्वात जवळचा मित्र