ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क म्हणाला आहे की वेगवान गोलंदाज पॅट कमिन्समध्ये कर्णधार होण्याची क्षमता आहे. क्लार्क म्हणाला की तो सध्याचा कसोटी कर्णधार पेन हा अनुपस्थित असताना ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व करू शकतो. ऑस्ट्रेलिया संघ व्यवस्थापकांनी त्याला उपकर्णधारपद देण्याचा अतिशय योग्य निर्णय घेतला आहे.
पॅट कमिन्सच्या उपकर्णधार होण्याने मी आनंदी
क्लार्क म्हणाला, “कमिन्स ही भूमिका निभावण्यासाठी तयार आहे. मला खुप आनंद आहे की त्याला पूर्णवेळ उपकर्णधारपद दिले आहे. मला अपेक्षा आहे की त्याला ऑस्ट्रेलिया किंवा ऑस्ट्रेलिया अ संघाच्या काही सामन्यात नेतृत्व करण्याची संधी मिळावी. जर त्याला नेतृत्व करण्याची संधी मिळाली तर, तो त्या जबाबदारी पासून मागे हटणार नाही. “
योग्य व्यक्तीला कर्णधार करणे गरजेचे
क्लार्क म्हणाला की, “ही धारणा चुकीची आहे की फलंदाज नेतृत्व करण्यास गोलंदाजांपेक्षा अधिक चांगला आहे.” तो म्हणाला, “वर्तमान काळातील क्रिकेटमध्ये फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही दुखापत होते. त्यांच्यानंतर त्यांना विश्रांती दिली जाते. माझ्यासाठी या पदासाठी गोलंदाज-फलंदाज यांच्यापेक्षा योग्य व्यक्तीला निवडणे जास्त गरजेचे आहे.”
स्मिथला पुन्हा नेतृत्व देण्याची मागणी
36 वर्षीय टीम पेन सध्या आपल्या कारकिर्दीतील शेवटचे काही वर्ष खेळत आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियात नवीन कर्णधार कोण असेल यावरून चर्चा सुरू आहे. काही माजी खेळाडूंनी स्मिथला पुन्हा कर्णधार करण्याची मागणी केली आहे. ज्यावर प्रशिक्षक जस्टीन लॅंगरने सांगितले आहे की त्याला कर्णधार बनवण्यासाठी काही प्रक्रिया आहे. ज्या पूर्ण करणे गरजेचे आहे.
चेंडू छेडछाड प्रकरणी स्मिथ-वॉर्नर यांना हटविले होते
स्मिथने 2018 साली चेंडूला छेडछाड केल्याच्या वादामुळे कर्णधार पदाचा राजीनामा दिला होता, त्याचबरोबर डेविड वॉर्नरला सुद्धा उपकर्णधार पद सोडावे लागले होते. स्मिथ – वॉर्नर यांच्यावर एक वर्षाची बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर टीम पेनला कसोटी आणि मर्यादित षटकांत एरॉन फिंच यांना ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व देण्यात आले होते. त्याचबरोबर पॅट कमिन्सला सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये उपकर्णधार पद दिले होते.
फिंच आणि पेन कडून कमिन्स खुप काही शिकू शकतो
क्लार्क म्हणाला, “फिंच आणि पेन हे दोघे सध्या चांगल्या प्रकारे नेतृत्व करत आहेत. यातून कमिन्सला खुप काही शिकायला मिळत आहे. त्याबरोबर भूमिकेसाठी जास्तीत जास्त संधी मिळत आहे.”
संबंधित बातम्या:
– म्हणून स्मिथने करावे ऑस्ट्रेलियाचे नेतृत्त्व; माजी दिग्गजाने सांगितले कारण
– पुन्हा ऑस्ट्रेलियाचे कर्णधारपद स्वीकारण्यास स्मिथ तयार? म्हणाला
– स्टीव्ह स्मिथकडे कर्णधारपद सोपवल्यास, ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक मॅथ्यू वेडचे मोठे विधान






