ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज यांच्यात सध्या कसोटी मालिकेचा पहिला सामना खेळला जात आहे. उभय संघांतील हा मालिका दोन सामन्यांची असून पहिला सामना पर्थवर खेळला जात आहे. या सामन्याच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज रिकी पाँटिंग याला समालोचन करताना पाहून चाहते आनंदी झाले. तत्पूर्वी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी समालोचन करणाताना पाँटिंगची प्रकृती बिघडल्यामुळे त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले गेले होते.
ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज यांच्यातील कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी रिकी पाँटिंग (Ricky Ponting) याने चाहत्यांची चिंता वाढवली होती. समालोचन करत असताना अचानक पाँटिंगच्या छातीत वेदना होऊ लागल्यामुळे त्याला तत्काळ रुग्णालयात नेले गेले होते. पण हा प्रकार घडल्यानंतर 24 तासांमध्येच पाँटिंग पुन्हा नव्या दमाने मैदानात परतला आहे. शनिवारी (3 डिसेंबर) त्याने चॅनल 7 वर बोलताना स्वतःच्या प्रकृतीविषयी महत्वाची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली.
पाँटिंगने यावेळी त्याचा मित्र आणि संघातील जुना सहकारी जस्टिन लँगर आणि 7 क्रिकेटची प्रमुख ख्रिस जोन्स यांचे तत्काळ निर्णयासाठी आभार मानले. या दोघांनी शुक्रवारी पाँटिंगच्या ह्रदयात त्रास होत असल्यामुळे त्याला उपचासाराठी आग्रम केला. याविषयी बोलतना पाँटिंग शनिवारी सकाळी म्हणाला, “मी काल अनेकांना घाबरवले होते आणि माझ्यासाठीही हा भीतीदायक क्षण होता. मी कॅमेंट्री बॉक्समध्ये बसलो होतो आणि काही वेळानंतर माझ्या छातीत वेदना होऊ लागल्या. यातून सुटका करून घेण्यासाठी मी प्रयत्न केले.”
“वेदना होत असताना मी कॅमेंट्री बॉक्सच्या मागे आलो. मला चक्कर आली आणि मी बेंचला जोरात पकडले. मी ही गोष्ट जस्टिन लँगरला सांगितली, जो माझ्यासोबत समालोचक करत होता. ख्रिस जोन्सने माझा आवाज ऐकला आणि तत्काळ निर्णय घेत मला तिथून हलवले. 10 किंवा 15 मिनटांमध्ये मी रुग्णालयात सर्वोत्तम उपचार घेत होते. आज मला खूप चांगले वाटत आहे. आज मी अगदी चमकदार आणि नवीन आहे,” असेही पाँटिंगने पुढे बोलताना सांगितले.
"I mentioned to JL who was commentating with me that I'd had these pains in my chest … 10 or 15 minutes later I was in the hospital getting the best treatment I possibly could."
– @RickyPonting talks about his last 24 hours pic.twitter.com/GnW8OADghg
— 7Cricket (@7Cricket) December 3, 2022
दरम्यान, उभय संघांतील या कसोटी सामन्याचा विचार केला, तर ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 4 बाद 568 धावांवर डाव घोषीत केला. प्रत्युत्तरात वेस्ट इंडीजने पहिल्या डावात 283 धावा केल्या. सामन्याच्या दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने दोन बाद 183 धावा केल्या आणि फलंदाजी वेस्ट इंडीजच्या हाती सोपवली. वेस्ट इंडीजला विजयासाठी शेवटच्या डावात एकूण 498 धावांचे लक्ष्य मिळाले. (Former Australian Captain Ricky Ponting returns to commentary box after suffering chest pains)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बांगलादेशला धक्क्यावर धक्के, ‘या’ गोलंदाजाच्या बाहेर जाण्याने रोहितची चिंता मिटली
नवे निवडसमिती अध्यक्ष म्हणून या दिग्गजाचे नाव आघाडीवर; वेळोवेळी मोठे केलेय देशाचे नाव