---Advertisement---

स्टीव्ह स्मिथ 35 वर्षांचा झाला, चाहत्यांनी स्टार फलंदाजाचे केले अभिनंदन!

On: रविवार, जून 2, 2024 1:03 PM
steven smith birthday
---Advertisement---

क्रिकेट विश्वातील महान फलंदाजपैकी एक आणि ऑस्ट्रेलियन संघाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथचा आज (2 जून) 35वा वाढदिवस आहे. सोशल मीडियातून स्टीव्ह स्मिथवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या बातमीद्वारे स्टीव्ह स्मिथच्या करिअरवर नजर टाकणार आहोत.

ऑस्ट्रेलियन संघाचा फलंदाजीचा कणा अशी ख्याती असलेला महान फलंदाज स्टीव्ह स्मिथचा आज 35वा वाढदिवस आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीत आपल्या संघास अनेकदा संकटातून बाहेर काढले आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) सहकाऱ्यांसह जगभरातील अनेक खेळाडूंनी सोशल मीडियावर या स्टार खेळाडूला शुभेच्छा दिल्या आहेत.

आयसीसीने (ICC) 2015 च्या विश्वचषकातील भारताविरुद्धच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियासाठी स्मिथच्या अविश्वसनीय शतकाचा एक छोटा व्हिडिओ ट्विट करून स्टीव्ह स्मिथला शुभेच्छा दिल्या आहेत.

स्टीव्ह स्मिथने आपल्या आतापर्यंत च्या कार्यकाळात 109 कसोटी सामने खेळले आहेत ज्यामध्ये 195 डावांत 9685 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये एकूण 32 शतकीय खेळींचा समावेश आहे. आतापर्यंत त्याने 158 एकदिवसीय सामने खेळल्या आहेत. ज्यामध्ये 5446 धावा केल्या आहेत त्यासोबतच 19 विकेट्स घेतल्या आहेत. तर टी 20 सामन्यात त्यांने आतापर्यत 67 सामने खेळल्या आहेत ज्यामध्ये त्याने 1094 धावा केल्या आहेत. 2021 साली जिंकलेल्या टी20 विश्वविजेता ऑस्ट्रेलिया संघाचा तो हिस्सा होता. तर 2015 आणि 2023 साली जिंकलेल्या एकदिवसीय विश्वचषकाचा ऑस्ट्रेलिया संघाचा तो हिस्सा राहिला आहे.

स्टीव्ह स्मिथने आपल्या कर्णधारपदाच्या कार्यकाळात 38 कसोटी सामन्यात 21 सामने जिंकला असून 7 अर्निर्णीत राह्यिल्या आहेत तर 10 सामन्यात पराभव झाला आहे. तर 58 एकदिवसीय सामन्यात त्याने 30 सामन्यात संघाला विजय मिळवून दिला आहे. तर 25 सामन्यात पराभवास सामोरे जावे लागले आहे. तर 3 सामने ड्राॅ झाल्या आहेत. स्टीव्ह स्मिथला आयसीसीने 2015 सालीच्या ‘क्रिकेटर ऑफ द ईयरचा’ पुरस्कार दिला होता.

महत्तवाच्या बातम्या-

विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात लगावला 103 मीटरचा षटकार! मैदानावरील सर्वच थक्क; पाहा VIDEO
काय करावं ते सुचेना! सराव सामन्यात रिषभ पंतच्या तुफानी खेळीनं गोलंदाजांच्या मनात भरली धडकी
यजमान अमेरिकेची विश्चचषकात विजयाने सुरुवात, कॅनडाचा 7 विकेट्सनी केला पराभव

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---