India Test Captain Shubman Gill: भारत आणि इंग्लंड संघातील पहिला कसोटी सामना लीड्सच्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध शानदार फलंदाजी केली, मात्र तरीही संघाला विजय मिळवता आला नाही. इंग्लंडने भारताचा 5 गडी राखून पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आता भारताचे लक्ष्य दुसऱ्या कसोटी सामन्यावर आहे. दुसरा सामना 2 जुलैपासून खेळवला जाईल. मात्र या सामन्यापूर्वी शुबमन गिलला एक खास सल्ला देण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू ब्रॅड हॅडीनचे मत आहे की गिलने आपल्या वागणुकीत बदल करण्याची गरज आहे. (Brad Haddin advice to Shubman Gill)
भारतीय संघाने पहिला सामना खराब गोलंदाजीमुळे गमावला, पण यासोबतच खराब क्षेत्ररक्षणही पराभवाचे एक प्रमुख कारण ठरले. भारताने अनेक वेळा सोपे झेल सोडले. यशस्वी जयpस्वालने एकट्यानेच 4 झेल सोडले. (Yashasvi Jaiswal dropped catches) भारताच्या खराब क्षेत्ररक्षणावर बोलताना ब्रॅड हॅडीन यांनी शुबमन गिलला इशारा दिला आहे.
ते म्हणाले की, प्रत्येक महान संघाची खासियत म्हणजे उत्कृष्ट फील्डिंग आणि मला वाटते की गिलने सध्याच्या संघात ही परंपरा सुरू केली आहे. जी चुकीची आहे. (Brad Haddin On Shubman Gill)
पुढे बोलताना हॅडीन म्हणाले, त्यांना आपल्या वागणुकीत बदल करणे गरजेचे आहे. जर तुम्हाला उत्तम फील्डिंग करायची असेल, स्पर्धात्मक राहायचे असेल, तर हे पूर्णतः तुमच्या दृष्टीकोनावर अवलंबून आहे. तांत्रिक काम मैदानाबाहेर करता येते, कितीही कोच असले तरी फरक पडत नाही. यावर्षी आयपीएल मध्येही कॅचिंग खूपच खराब होते आणि त्याचा परिणाम कसोटीत दिसतो आहे. (Brad Haddin On Team India)
भारत सध्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 ने पिछाडीवर आहे. दुसरा सामना 2 जुलैपासून एजबॅस्टनमध्ये रंगणार आहे. हा सामना जिंकण्यासाठी भारताला तिन्ही विभागात (फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण) उत्कृष्ट कामगिरी करावी लागणार आहे. त्यामुळे भारतीय संघ कशा पद्धतीने पुनरागमन करतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (India vs England 2nd Test)





