fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

गणेशोत्सवानिम्मित ब्रेट लीने घेतले गणपतीचे दर्शन

भारतात सर्वत्र आणि खास करून महाराष्ट्रात गणेश चतुर्थीमुळे उत्साह आणि उल्हासाचे वातावरण आहे. भारतीय सण,  उत्सव आणि संस्कृतीविषयी परदेशी खेळाडूंना प्रचंड आवड आहे. आँस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली यालाही भारतीय संस्कृतीविषयी प्रेम आहे.

सध्या महाराष्ट्रात गणेशोत्सव सुरु आहे. हा आनंद व्दिगुणीत होण्यास कारण ठरला ब्रेट ली आणि त्याची खास वेशभूषा.

त्याने चक्कं कुर्ता-पायजम्यात मुंबईमधील सायन इथल्या गणेश मंडळाला भेट देऊन तिथे बाप्पांचे दर्शन घेतले. यावेळी तिथे उपस्थित असणाऱ्या सर्व जणांना ब्रेट ली ला बघून नक्कीच एक सुखद धक्का बसला असेल.

ब्रेट सोबतच मायकल क्लार्क, डॅनी मॉरिसन आणि इतर अनेक परदेशी खेळाडूंनी आयपीएलच्या निम्मिताने भारतीय वेशभूषा परिधान केल्या आहेत. परदेशी खेळाडूंचे भारत आणि भारतीयांविषयी असलेलं प्रेम हे वेळोवेळी दिसून येतं, मग ते आपले सण साजरे करणं असो किंवा भारतीय खाद्यपदार्थ आवडीने खाणं असो.

ब्रेट ली हा १५ सप्टेंबर पासून सुरु होणाऱ्या एशिया कपमध्ये समालोचक म्हणून काम पाहणार आहे. गणेशोत्सवानिमित्त त्याने भारतात धावती भेट दिली असे म्हणायला हरकत नाही.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

हा पाकिस्तानी गोलंदाज म्हणतोय विराटविना देखील भारत तितक्याच ताकदीचा

भारताचे जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे आव्हान संपुष्टात

You might also like