पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) हा एकेकाळी भारतीय क्रिकेटचा स्टार खेळाडू मानला जात होता, पण अलीकडच्या काळात तो खेळापेक्षा वादांमुळेच अधिक चर्चेत असतो. अलीकडेच फिटनेसच्या समस्येमुळे त्याला मुंबईच्या रणजी संघातूनही वगळण्यात आले आहे. दरम्यान आता भारताचे माजी प्रशिक्षक आणि ऑस्ट्रेलियाचे दिग्गज खेळाडू ग्रेग चॅपल (Greg Chappell) यांनी पृथ्वी शाॅ ला पत्र लिहून सहानुभूती व्यक्त केली आहे.
ग्रेग चॅपल (Greg Chappell) यांनी आपल्या पत्रात लिहले की, “तू सध्या कठीण प्रसंगांना तोंड देत आहेस. मुंबई संघाबाहेर गेल्यानंतर निराश होणे स्वाभाविक आहे. पण मी तुला सांगू इच्छितो की असे क्षण अनेकदा खेळाडूंसाठी टर्निंग पॉइंट्स म्हणून देखील ओळखतात. खेळाडूची कारकिर्द मजबूत करण्यात त्याची मदत होते.”
ग्रेग चॅपल यांनी आपल्या पत्रात ऑस्ट्रेलियन दिग्गजाने स्वतःचे आणि डॉन ब्रॅडमनसारख्या महान क्रिकेटपटूचे उदाहरण दिले, ज्यांनी आपल्या कारकिर्दीत अशा कठीण परिस्थितींशी झुंज दिली. चॅपेल यांनी लिहले की, “प्रत्येक महान खेळाडूला त्याच्या कारकिर्दीत अनेक अडथळे येतात. त्याला उत्तर देऊनच ते महान खेळाडू होतात.”
ग्रेग चॅपल यांनी आपल्या पत्राच्या शेवटी लिहले की, “अनेक लोकांचा अजूनही तुमच्यावर विश्वास आहे आणि ते पुन्हा शिखरावर जाण्यासाठी तुमच्या प्रवासाला पाठिंबा देण्यास तयार आहेत. मी तुम्हाला कोणत्याही प्रकारे मदत करू शकत असल्यास, तुम्हाला काही प्रश्न असल्यास, माझ्यापर्यंत पोहोचण्यास अजिबात विचार करू नका.”
पृथ्वी शाॅच्या (Prithvi Shaw) आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने भारतासाठी 5 कसोटी, 6 एकदिवसीय आणि 1 टी20 सामना खेळला आहे. 5 कसोटी सामन्याच्या 9 डावात फलंदाजी करताना त्याने 42.37च्या सरासरीने 339 धावा केल्या आहेत. कसोटीमध्ये त्याने 2 अर्धशतकांसह 1 शतकही झळकावले आहे. दरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या 134 राहिली आहे.
पृथ्वी शाॅने 6 एकदिवसीय सामन्यात 113.85च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना 189 धावा केल्या आहेत. पण एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने एकही शतक किंवा अर्धशतक झळकावले नाही. त्याची सर्वोच्च धावसंख्या 49 राहिली आहे. शाॅ हा भारतासाठी केवळ एकच टी20 सामना खेळला आहे. त्यामध्ये त्याला खातेही उघडता आले नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs SA; अशी असू शकते भारतीय संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन, हे खेळाडू करणार पदार्पण?
VIDEO; ‘या’ महान क्रिकेटपटू पुढे झुकला होता विराट कोहली, स्वत:च सांगितला किस्सा
आयपीएलमध्ये सर्वोच्च धावसंख्या ठोकणारे (टाॅप-5) खेळाडू