ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार आणि समालोचक लिसा स्थळेकरला सध्या भारतीय मसाल्यांची कमी जाणवत आहे. त्यांनी याबाबत एक फोटो ट्विट केला आहे.
हे फोटो शेअर करण्याबरोबरच तिने लिहिले की, आता मी संपूर्ण उन्हाळ्यात मेलबर्नला शिफ्ट झाली आहे. त्यामुळे माझ्या स्वयंपाकघरात मला एका गोष्टीची खुप कमी जाणवत आहे, ती म्हणजे भारतीय मसाले. मला शक्य तितक्या लवकर भारतीय मसाल्याचे दुकान शोधावे लागेल.
लिसा यांचे भारतीय मसाल्यांवरील प्रेम यामुळे देखील आहे, कारण तिचा जन्म भारतातील पुणे शहरात झाला होता आणि त्यानंतर तिला हरेन आणि स्यू स्थळेकर यांनी दत्तक घेतले होते आणि ऑस्ट्रेलियाला नेले होते. तिने तिथेच क्रिकेट खेळले आणि नंतर राष्ट्रीय संघाचे कर्णधारपदही भूषवले.
Now that I have moved down to Melbourne for the entire summer. The only thing now missing in my pantry is this⬇️⬇️ Still need to find my local spice shop! #missingindianfood pic.twitter.com/uqOg1sNoIc
— Lisa Sthalekar (@sthalekar93) October 4, 2021
लिसा सध्या भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघादरम्यान सुरू असलेल्या मालिकेत समालोचन करत आहे. तिने नुकतीच भारतीय संघावर दिवस-रात्र कसोटी अनिर्णित राहिल्याबद्दल टीका केली होती. ती म्हणाली होती की, भारताने या सामन्याचा निकाल आपल्या बाजूने लावण्यासाठी शौर्य दाखवले नाही.
या सामन्यात भारताने पहिल्या डावात सुमारे ३ दिवस फलंदाजी केली. या दरम्यान भारतीय संघ १४५ षटके खेळला. या कसोटीचे पहिले दोन दिवस पावसामुळे मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले. भारताने तिसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात ३७७ धावांवर आपला डाव घोषित केला होता. यानंतर सामन्यात फक्त १ दिवसाचा खेळ शिल्लक होता. अशा स्थितीत निकालाची अपेक्षा फारच कमी होती. पण ऑस्ट्रेलियाने सामन्याच्या चौथ्या दिवशी दुपारच्या जेवणानंतर ९ बाद २४० धावांवर आपला डाव घोषित करून सामन्यात काही उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण ते अपुरे असल्याचे सिद्ध झाले आणि शेवटी तो ऐतिहासिक कसोटी सामना अनिर्णित राहिला.
लिसा स्थळेकरचा पुणे ते ऑस्ट्रेलिया पर्यंतचा प्रवास
लिसाची ऑस्ट्रेलिया गाठण्याची कहाणी बरीच रोचक आहे. लिसाला तिच्या पालकांनी पुण्यातील एका अनाथाश्रमात सोडले होते. नंतर स्थळेकर दांपत्याने तिला दत्तक घेतले, ज्यांनी लिसाला अमेरिकेत आणले. तेथे काही वर्षे घालवल्यानंतर, स्थळेकर दांपत्य आपल्या कुटुंबासह केनियाला गेले आणि नंतर ऑस्ट्रेलियामध्येच स्थायिक झाले. लहानपणी वडिलांनी लिसाला क्रिकेट क्लबमध्ये प्रवेश मिळवून दिला होता.
तेथेच तिने क्रिकेटचे बारकावे शिकले आणि एक दिवस त्या ऑस्ट्रेलियासाठी खेळली आणि नंतर या देशाच्या क्रिकेट संघाचे नेतृत्वही केले. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर लिसा समालोचनात हात आजमावत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
धोनीच्या खेळीला ‘टेस्ट इनिंग’ म्हणणाऱ्यांना फ्लेमिंगने सुनावले, म्हणाला…
मोठी बातमी! केवळ चेन्नईलाच नाही इंग्लंडलाही मोठा धक्का, सॅम करन आयपीएल अन् टी२० विश्वचषकातून बाहेर






