चेन्नई सुपर किंग्स संघासाठी मागील हंगाम अत्यंत खराब गेला. सीएसकेला मागील हंगामात खेळलेल्या 14 सामन्यांपैकी फक्त 4 सामने जिंकता आले. हंगामाच्या सुरुवातीला एमएस धोनीनेे कर्णधारपदाची जबाबदारी रवींद्र जडेजा याच्याकडे सोपवली होती. मात्र, वाढलेल्या दबावामुळे जडेजाने कर्णधारपदाचा त्याग केेला आणि परत एकदा कर्णधारपद धोनीला भुषवावे लागले. काही माध्यमांच्या मते धोनीचा हा शेवटचा हंगाम असु शकतो. धोनीनंतर संघाचा कर्णधार कोण असु शकतो हा प्रश्न सर्वांनाच पडला असेल. अशातच ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू आणि सीएसके संघाचा भाग राहिलेल्या मायकल हसी यांनी नवा हंगाम सुरु होण्याआधी सीएसकेचा पुढचा कर्णदार कोण असू शकतो याची भविष्यवाणी केली आहेे.
मायकल हसी (Michael Hussey) म्हणाले की ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) हा धोनीप्रमाणेच शांत आहे आणि दबाव चांगल्या पद्धतीने हाताळू शकतो. या ऑस्ट्रेलियन दिग्गजांनी म्हटले की ऋतुराजमध्ये काही अविश्वसनीय नेतृत्व गुण आहेत आणि त्याच्या स्वभावामुळे लोक त्याच्याकडे आकर्षित होतात. एका वृत्तसंस्तेशी बोलताना हसी म्हणाले की, “त्याने धोनीला जवळून खेळताना पाहिलय. त्याच्याविषयी दुसरी चांगली गोष्ट अशी की तो त्या गोष्टी लवकर समजून घेतो, ज्या बाकीच्या खेळाडूंच्या नजरेत येत नाहीत. त्याने स्वत:ला घडवलय आणि तुम्हाला मदतीची गरज आहे. त्यामुळे ऋतुराज चांगला पर्याय ठरु शकतो आणि तो इतर खेळाडूंच्या तुलनेत नव्या गोष्टी लवकर शिकतो.”
एमएस धोनी (MS Dhoni) निवृत्ती घेण्याच्या मार्गावर असल्याने चेन्नई सुपर किंग्ज संघ भविष्यात नेतृत्व करण्यासाठी योग्य उमेदवाराचा शोध घेत आहे. सीएसके संघाची भविष्यातील कर्णधाराची शोध मोहिम सुरु आहे. मात्र, माजी ऑस्ट्रेेलियन खेळाडू आणि सीएसके संघाचेे माजी फलंदाज मायकल हसी यांनी आपला आवडता खेळाडू निवडला आहे, जो धोनीची जागा घेऊ शकतो.
हसी म्हणाले की चेन्नई सुपर किंग्ज संघ युवा खेळाडू ऋतुराज गायकवाड याला कर्णधारपद देण्याचा विचार करु शकतो. ऋतुराज मागील काही काळापासून चांगल्या खेळाचे प्रदर्शन करत आहे.(Former Australian Cricketer Michael Hussey gave his opinion on CSK’s next captain)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोहम्मद शमीपाठोपाठ रिषभ पंतही वनडे मालिकेतून बाहेर, खुद्द बीसीसीआयने सांगितले कारण
भारतीय क्रिकेटला बदनाम करणारे माईक डेनिस: ज्यांनी केलेली अर्धी टीम इंडिया बॅन