ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू ब्राॅड हाॅगने एका प्रश्नाला उत्तर देताना क्रिकेट विश्वात टी20मध्ये पहिल्यांदा द्विशतक करु शकणाऱ्या खेळाडूचं नाव सांगितलं आहे.
हाॅगने ट्विटरवर एक प्रश्नउत्तरांचा तास घेतला होता. त्यात त्याला एका प्रेक्षकाने “टी20मध्ये कोण प्रथम द्विशतक करणार?” असा प्रश्न विचारला होता.
यावर हाॅग रोहित शर्मा असे उत्तर दिले आहे. “मला सध्यातरी रोहित शर्मामध्येच ही गोष्ट दिसतेय. रोहितकडे क्रिकेटमधील चांगले फटके खेळण्याची क्षमता आहे. तो मैदानात कुठेही षटकार मारु शकतो. त्याचं टायमिंग जबरदस्त आहे.” असे हाॅगने आपल्या उत्तरात लिहीले आहे.
Rohit Sharma at presently is the only player I think capable of it. Good strike rate, all timing, and plays cricketing shots finding six options all around the ground. https://t.co/WmHatsrJpO
— Brad Hogg (@Brad_Hogg) March 15, 2020
रोहितने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये डावात 118 या सर्वोत्तम धावा केल्या आहेत तर वनडे डावात 264 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे.
ब्रॅड हाॅग हा ऑस्ट्रेलियाचा महान खेळाडू होता. त्याने ऑस्टेलियाकडून 7 कसोटी, 123 वनडे व 15 टी20 सामने खेळले आहेत.
ट्रेडिंग बातम्या-
भारताचे हे इनडोअर क्रिकेट ग्राउंड नाही फाइव्ह स्टार हॉटेलपेक्षा कमी, पहा फोटो
क्रिकेटपासून दूर असलेला अश्विन चेन्नईकरांवरच भडकला
रणजी ट्राॅफीमधील शानदार कामगिरीचं उनाडकटला मिळणार तेवढंच मोठं गिफ्ट