या वर्षाआखेरीस भारतीय संघ ऑस्ट्रेलियाचा दाैरा करणार आहे. ज्यामध्ये टीम इंडिया 5 कसोटी सामने खेळणार आहे. भारतीय संघ मागील दोन मालिकेत ऑस्ट्रेलियामध्ये तिंरगा फडकावला आहे. शेवटच्या दोन मालिकेत भारताने कांगारुनां धोबीपछाड दिला आहे. यंदा टीम इंडिया तिसऱ्यांदा यजमान संघाला हरवून मालिका विजयाची हॅट्ट्रीक करण्यासाठी मैदानात उतरेल. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियन संघ भारताला रोखण्याचे नक्कीच प्रयत्न करतील. आता या दरम्यान दोन्ही संघातील मजी क्रिकेटपटूंनी अनेक दावे प्रतिदावे करत आहेत. आता ऑस्ट्रेलिया संघाचा माजी विकेटकीपर फलंदाज गिलख्रिस्टने बाॅर्डर-गावस्कर मालिकेवर भविष्यवाणी केला आहे. गिलख्रिस्टने त्यासंघाचे नाव जाहीर केला आहे, जो यंदाची स्पर्धा जिंकण्यात यशस्वी ठरणारआहे.
टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये गिलख्रिस्टने बाॅर्डर-गावस्कर मालिका जिंकणाऱ्याला संघाला निवडले आहे. माजी ऑस्ट्रेलियाचा फलंदाज भविष्यवाणी करताना म्हणाला “स्वाभाविकच आहे मी ऑस्ट्रेलियाचेच नाव घेणार आहे. आशा ते यंदाची मालिका जिंकतील. पण यावेळेसची मालिका अटीतटीची होणारआहे. दोन्ही संघामध्ये कमालीचे सामने पहायला मिळतील”
या मालिकेवर वक्तव्य करताना तो पुढे म्हणाला, “ही मालिका दोन्ही संघासाठी कठीण स्पर्धा होणार आहे. यजमान संघावर जबाबदारी असणार आहे की, ते आपल्या घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया आधिक मजबूत संघ आहे. तर भारतला माहिती आहे की, विदेशात कसे सामने जिंकायचे. सध्याच्या घडीला त्यांच्या (भारत) टीमची गोलंदाजी युनिट आधिकाधिक संघांपेक्षा चांगली आहे. ते येथील (ऑस्ट्रेलिया) परिस्थितीशी जुळवून घेण्यात सक्षम आहेत. या व्यतीरिक्त भारताकडे शानदार फलंदाजांची फळी आहे. ही मालिका खूप खूप टक्कर आणि बराबरीची होणार आहे.”
भारताने ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदाच त्यांच्या घरामध्ये (देशात) 2018-19 मध्ये हरवले होते. यानंंतर 2020-21 मध्ये टीम इंडिया ही मालिका पुन्हा एकदा जिंकण्यात यशस्वी ठरली होती. 2018-19 मध्ये भारतने ऑस्ट्रेलियाला 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 ने हरवले होते. तर 2020-21 मध्ये सुद्धा भारताला याच पद्धतीने कांगारुंना नमवले होते.
हेही वाचा-
धोनी नंबर 2…ॲडम गिलख्रिस्टनं सांगितली जगातील 3 महान यष्टीरक्षकांची नावं; पहिला क्रमांक कोणाचा?
गिल की जयस्वाल; चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रोहित शर्माचा जोडीदार कोण? दिग्गज क्रिकेटपटूचा मोठा दावा
टी20 पाठोपाठ आता कसोटीतूनही राहुलचा पत्ता कट होणार? सोपं गणित समजून घ्या