ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात २०१८ मध्ये झालेल्या कसोटी सामन्यात चेंडू सोबत छेडछाड करण्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणात ऑस्ट्रेलियाचा तात्कालीन कर्णधार स्टीव्ह स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट हे तिघे दोषी आढळल्याने त्यांच्यावर बंदीची कारवाई झाली होती. ही शिक्षा पूर्ण करत या तिन्ही क्रिकेटपटूंनी पुन्हा क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. मात्र आता तीन वर्षांनंतर हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत येऊ लागले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा स्मिथसमोरील अडचणीत वाढ होऊ शकते.
काही दिवसांपूर्वी बॅनक्रॉफ्टने गोलंदाजांना चेंडू छेडछाडीबद्दल माहिती असल्याचे, धक्कादायक वक्तव्य केले होते. त्यामुळे पुन्हा या प्रकरणाची तपासणी सुरु झाली होती. त्यानंतर अनेक दिग्गजांनी याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. आता मार्क टेलर या माजी क्रिकेटपटूने म्हटले आहे की यामुळे स्मिथच्या पुन्हा कर्णधार बननण्याच्या आशेला धक्का लागला आहे.
काही दिवसांपूर्वीच स्मिथने पुन्हा कर्णधार बनण्याबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया दिली होती. तसेच त्याच्या पुन्हा कर्णधारपद देण्यासाठी विद्यमान कसोटी कर्णधार टिम पेननेही समर्थन दिले होते.
पण आता टेलर यांनी ‘स्पोर्ट्स संडे’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “यामुळे मदत मिळणार नाही. यात काहीच शंका नाही की याप्रकरणामुळे स्मिथच्या कर्णधार होण्याच्या शक्यतांना नुकसान पोहचेल. कारण मला विश्वास आहे की, या खेळाशी जोडलेल्या असंख्य लोकांना वाटत असेल की, या प्रकरणाला पूर्णविराम लागावा. परंतु यात काहीच शंका नाही की, हे सर्व लगचेच थांबेल. स्टीव्ह स्मिथ संभाव्य कर्णधार होण्यासाठी वातावरण तयार होत होते, यात काही शंका नाही. ”
खरंतर टीम पेनच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन कसोटी संघाला साजेशी कामगिरी करण्यात यश अपयश आले आहे. भारतीय संघाने २०१८-१९ आणि २०२१-२१ मध्ये झालेल्या कसोटी मालिकेत धूळ चारली होती. त्यामुळे स्टीव्ह स्मिथला पुन्हा कर्णधारपद देण्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र, पुन्हा चेंडू छेडछाड प्रकरणाची चर्चा सुरु झाली असल्याने या शक्यतांना धक्का लागल्याचे टेलर यांनी स्पष्ट केले.
महत्त्वाच्या बातम्या –
मुंबई क्रिकेट संघाला नव्या महागुरूचा शोध; रणजी क्रिकेट गाजवणारे शिलेदार शर्यतीत
कसोटी क्रिकेटमध्ये १ ते ११ क्रमांकावर सर्वाधिक शतके ठोकणारे भारतीय फलंदाज, पाहा संपूर्ण यादी
‘या’ गोष्टीमुळे जसप्रीत बुमराहची कारकीर्द आहे धोक्यात, रिचर्ड हॅडली यांचा इशारा