कसोटी क्रिकेट हा आजही क्रिकेटचा अभिजात प्रकार मानला जातो. कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणे, हे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते. त्यातही आंतरराष्ट्रीय पातळीवर कसोटी शतक नावावर असणे, ही अभिमानास्पद कामगिरी समजल्या जाते. मात्र काही क्रिकेटपटूंनी ही कामगिरी एक-दोनदा नाही तर सातत्याने केली आहे. आजच्या लेखात आपण अशा भारतीय खेळाडूंचा आढावा घेऊया, ज्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये १ ते ११ क्रमांकावर फलंदाजी करतांना सर्वाधिक शतके केली आहेत.
१) सलामीचा क्रमांक – भारताकडून सलामीला फलंदाजी करतांना म्हणजेच पहिल्या आणि दुसर्या क्रमांकावर फलंदाजी करतांना अनेक दिग्गज खेळाडूंनी शतक झळकवले आहे. मात्र यात सलामीला येऊन सर्वाधिक शतक ठोकण्याचा मान महान फलंदाज सुनील गावसकर यांच्या नावे आहे. सलामीवीर म्हणून त्यांनी ३३ शतके झळकावली आहेत.
२) तिसरा क्रमांक – तिसर्या क्रमांकावर सर्वाधिक शतके झळकावण्याचा मान अपेक्षेप्रमाणे ‘द वॉल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहुल द्रविडकडे जातो. द्रविडने तिसर्या क्रमांकावर खेळतांना कसोटी क्रिकेटमध्ये ३६ शतके मारली आहेत.
३) चौथा क्रमांक – हा क्रमांक देखील अपेक्षेप्रमाणे भारताचा सार्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडुलकरकडे गेला आहे. चौथ्या क्रमांकावर खेळतांना सचिनने एकूण ४४ शतके ठोकण्याचा पराक्रम केला आहे.
४) पाचवा क्रमांक – या क्रमांकावर सर्वाधिक शतके झळकावण्याचा मान शैलीदार फलंदाज मोहम्मद अझरुद्दीन जातो. पाचव्या क्रमांकावर खेळतांना त्याच्या नावे कसोटी क्रिकेटमध्ये १६ शतके आहेत.
५) सहावा क्रमांक – या क्रमांकावर संयुक्तपणे दोन फलंदाज विराजमान आहेत. रवी शास्त्री आणि व्हीव्हीएस लक्ष्मण हे दोघेही या स्थानावर आहेत. कारण त्यांच्या नावे सहाव्या क्रमांकावर खेळतांना प्रत्येकी ५ शतके आहेत.
६) सातवा क्रमांक – भारताकडून सातव्या क्रमांकावर सर्वाधिक शतके ठोकण्याचा कारनामा महान अष्टपैलू खेळाडू कपिल देव यांच्या नावे आहे. या क्रमांकावर खेळतांना त्यांनी एकूण ५ शतके ठोकली आहेत.
७) आठवा क्रमांक – या क्रमांकांवर भारतीय संघाचा विद्यमान अष्टपैलू खेळाडू आर अश्विन विराजमान आहे. अश्विनच्या नावे कसोटी क्रिकेटमध्ये आठव्या क्रमांकावर एकूण ३ शतके आहेत.
८) नऊ, दहा आणि अकरावा क्रमांक – भारतीय संघाकडून अद्याप नवव्या, दहाव्या आणि अकराव्या क्रमांकाकडून खेळतांना एकाही खेळाडूने शतक मारले नाही आहे. नवव्या क्रमांकावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या शॉन पॉलकने शतक झळकावले आहे. तर दहाव्या क्रमांकावर केवळ ऑस्ट्रेलियाच्या रेगी डफ या खेळाडूने शतक झळकवले आहे. मात्र अकराव्या क्रमांकावर फलंदाजी केलेल्या एकाही फलंदाजाच्या नावावर अद्याप एकही कसोटी शतक नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
या गोष्टीमुळे जसप्रीत बुमराहची कारकीर्द आहे धोक्यात, रिचर्ड हॅडली यांचा इशारा
हे भारी आहे! ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये आता सचिन, विराटच्या नावाने असणार घराचा पत्ता
“भारताविरुद्ध शून्यावर बाद झाल्याने कर्णधाराचा ओरडा खावा लागला होता”





